निरोगी जीवनासाठी योगाची कास धरा
दिनेश पांडे यांचे योगसाधकांना आवाहन
अकोला :
योगगुरु तथा अ.भा.ग्राहक पंचायत महानगर अध्यक्ष दिनेश पांडे व सुरेखा बोरकर यांच्या सान्निध्यात आरोग्यधाम, माधव नगर, गोरक्षण रोड येथे योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य योगसाधकांना योगाचे जीवनात किती महत्व आहे, याचे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
निरोगी जीवनासाठी योगाची कास धरली पाहिजे,याचे सखोल विवेचन योग साधकांना योगाचे धडे गिरवत दररोज योगा आवर्जून केलाच पाहिजे असे दिनेश पांडे व सुरेखा बोरकर यांनी सांगितले.
सुरेखा बोरकर व सौ. ज्योती देशमुख यांनी एमराॅड स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना योग दिना निमित्त योगाचे मार्गदर्शन केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा