• प्रा. अजहर हुसेन विदर्भ कॅरम असोसिएशनचे 'चीफ पेट्रॉन'!
अकोला :
ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे चीफ पेट्रॉन माजी आमदार गिरीश व्यास यांची विदर्भ कॅरम असोसिएशनच्या अध्यक्षपदी तर माजी मंत्री प्रा. अजहर हुसेन 'चीफ पेट्रॉन' म्हणून निवड करण्यात आली.
अ. भा. कॅरम फेडरेशन अंतर्गत झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी संदीप पुंडकर, सचिवपदी प्रभजीतसिंग बछेर, कोषाध्यक्षपदी अॅड. सुभाष मुंगी यांची निवड करण्यात आली.
तसेच असोसिएशनच्या सहसचिवपदी हनीफ मोहम्मद तर कार्यकारी सदस्य म्हणून अॅड. सुभाषसिंह ठाकूर, अॅड. सुमेध मुंगी. जिब्राईल दिवान, अय्युब शाह उस्मान शाह, विलास मुकादम, तनवीर अहमद खान, विदर्भ कॅरम असोसिएशनचे आयोजक म्हणून इकबाल मोहम्मद तर कोच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू नवल मेश्राम यांची नियुक्ती कार्यकारी मंडळाच्या सभेत करण्यात आली. हॉटेल जसनागरा येथे झालेल्या सभेत प्रा. अजहर हुसेन यांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे गिरीश व्यास यांना सोपविली. या निवडूक सभेचे संचालन बछेर यांनी तर आभार पुंडकर यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा