जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता
अकोला, दि. 24 :
नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे
व-हाडातील पाचही जिल्ह्यांमध्ये २९ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या कालावधीत वा-याचा वेग ताशी ३० ते ४० किमी प्रतितास राहील. वीज, वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आसरा घेऊ नये. या काळात ड्रेनेज, सखल भाग, रस्त्याचे अंडरपास किंवा जिथे पाणी साठते, अशा ठिकाणी जाणे टाळावे. पूर आलेल्या रस्त्यावरून चालू नये. जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेला, खांबाला बांधू नये अशा दक्षतेबाबत सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा