मुख्य सामग्रीवर वगळा

नपा शिक्षकांच्या प्रलंबित समस्या  निकाली लागणार 


आ. साजिद खान आणि शिक्षक 
आ. धीरज लिंगाडे यांनी घेतली मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक 

अकोला : 
गेल्या पंधरा - सोळा वर्षांपासून मनपा शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. सदर समस्यांना घेऊन शिक्षक आ. धीरज लिंगाडे व आ. साजिद खान पठाण यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांना घेऊन मंगळवारी सकाळी बैठक घेत, या सर्व समस्या मांडल्या असत्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिले. 
        यावेळी उपआयुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना, संजय खराटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 
         गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगापासून शिक्षक अद्यापही वंचित असून त्याची थकबाकी रक्कम देण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे बाबत, चाळीस शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची थकबाकी रक्कम मिळण्याबाबत, तसेच मुख्याध्यापक पदी नियुक्ती जारी करण्यात आली असली तरी मात्र आर्थिक लाभ देण्यात आला नाही तो देण्यात यावा, सोबतच सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांची पदोन्नती देण्यात यावी, आर. टी. इ. कायद्यानुसार शिक्षकांचा कार्यालयीन कामकाजाचा पदभार काढण्यात यावा, मनपाची बिंदूनामावली मंजूर नसतानाही इतर जिल्ह्यातील शिक्षकांना मनपा शाळेत नियुक्ती देण्यात आली आहे, ही बाब गंभीर असून याची चौकशी करण्यात यावी, तसेच जे बिंदू नामावली नुसार मनपा शाळेत समायोजित झाले आहेत त्यांनाच कायम करण्यात यावे, इतर शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठविण्यात यावे, १० वर्षांपासून जे शिक्षक एकाच शाळेवर कार्यरत आहेत त्यांच्या बदल्या करण्यात याव्या, तसेच मनपाने सातव्या वेतन आयोगाच्या नुसार एरिअर्स न देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो मागे घेत नियमाप्रमाणे सर्व शिक्षकांना देण्यात यावा, सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्यास होणारी अडचण दूर करण्यात यावी, शिक्षकांचे जीपीएफ व सेवा पुस्तकांचे अपूर्ण असलेले कार्य पूर्ण करण्यात यावे, मनपा शिक्षक विभागातील प्रशासकीय रिक्त पदे भरण्यात यावी, अशा अनेक मागण्या यावेळी शिक्षक संघटनांनी आयोजित बैठकीत मांडल्या.                    यावेळी मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, पराग कांबळे, अब्दुल रहीम पेंटर, योगेश कळसकर, तपसू मानकीकर, प्रा. नरेंद्र लाखाडे, पंकज देशमुख, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे सै. जव्वाद हुसैन, सरदार खान, मजबूर अहमद, सईद खान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अनिल अघडते, रवींद्र वानखेडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गोकुळ हरणे, श्रीकांत भूतकर, न.पा. शिक्षक संघाचे राजू भिरड, शेख रहेमान, अपंग अधिकारी कर्मचारी संघाचे मो. अब्दुल अजीज, शेर जमा खान, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राम शेगोकार, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. 



भौतिक सुविधेसह शिक्षणाची 
गुणवत्ता वाढवावी 

         मनपा शाळांची भौतिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, सोबतच अनेक ठिकाणी पाहणीत आढळून आले की, पावसात शाळेची छत गळते, वर्गामध्ये पाणी साचते, शाळेच्या आवारात सुद्धा मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी यासह अनेक भौतिक सुविधांचा अभाव आढळून आला आहे. मनपा शाळांची भौतिक अवस्था सुधारण्यात यावी, विद्यार्थ्यांना बसायला डेस्क बेंच उपलब्ध करून देण्यात यावे सोबतच शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे निर्देश आ. पठाण यांनी बैठकीत दिले. 


डिजिटल क्लासरूम 
उभारणीसाठी पुढाकार 

        खाजगी शाळांच्या तुलनेत मनपाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अद्यावत यंत्रणेचा उपयोग करून शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल क्लासरूम उभारणी करण्यात यावी. तसेच सध्या तंत्रज्ञानाच्या युगात मनपा शाळांमध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत डिजिटल क्लासरूम उभारण्यात यावे, यासाठी निधीची व्यवस्था करण्यात यावी, निधी कमी पडल्यास प्रस्ताव सादर करा आपण शासनाला पाठपुरावा करून निधी खेचून आणणार अशा सूचना आ. पठाण यांनी यावेळी केल्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...