अ.भा.ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत उपाध्यक्ष नगीनदास बैरागी यांचा आकस्मिक दौरा
अकोला : अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकोला येथे बुधवार दिनांक १८ जून ला दुपारी १२.३० वाजता विदर्भ प्रांत उपाध्यक्ष नगीनदासजी बैरागी आणि बुलढाणाचे सचिव श्रीकांत अंधारे अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते.
नगीनदासजी बैरागी यांची नुकतीच प्रांत उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अकोलाचे वतीने अ.भा.ग्राहक पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनजीत देशमुख यांनी विजय बाहाकर लिखीत झुंजार नेता व स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देशमुख ही दोन पुस्तके व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच त्यांच्यासोबत आलेले बुलढाणा सचिव श्रीकांत अंधारे यांचे पुस्तके व गुलाब पुष्प देऊन अ.भा.ग्रा.पंचायतचे महानगराध्यक्ष दिनेश पांडे यांनी सत्कार केला. जिल्हाध्यक्ष मनजीत देशमुख व महानगराध्यक्ष दिनेश पांडे यांनी प्रांत उपाध्यक्ष यांचेशी जिल्ह्यातील अनेक समस्याबाबत सविस्तर चर्चा केली.
गेल्या वर्षभरात ७४ तक्रारी प्राप्त झाल्या व त्यातील अनेक समस्या सोडविल्याचे सांगितले.
प्रांत उपाध्यक्ष नगीनदासजी यांनी अ.भा.ग्राहक पंचायतच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी मनजीत देशमुख व महानगराध्यक्षपदी दिनेश पांडे, तसेच विजय बाहाकर यांची विदर्भ प्रांत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गुलाब पुष्प व अखिल भारतीय ग्राहक पंचायतला पन्नास वर्ष पूर्ण झाल्या निमित्त बुलढाणा जिल्ह्याने आगळी वेगळी तयार केलेली "की चेन" देऊन विजय बाहाकर केशव नगर अकोला त्यांच्या निवासस्थानी प्रांताच्या वतीने सत्कार केला.
तसेच विदर्भ प्रांताच्या सूचनेप्रमाणे वेळेपूर्वी बैठक घेऊन कार्यकारणी तयार केल्याबद्दल धन्यवाद सुद्धा दिले.
उपाध्यक्ष नगीनदास वैरागी त्यांनी 31 जुलै २०२५ पूर्वी तालुका कार्यकारण्या गठीत करण्याबाबत सांगितले.
तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आव्हान केले.अशी विजय बाहाकर यांनी माहिती दिल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा