• संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवा
• ना.अॕड. आकाश फुंडकर यांच्या सूचना
अकोला :
सतत दोन दिवसापासून येत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊ नये, तसेच त्याचा फटका नागरिक, ग्रामस्थांना पडू नये, यासाठी शासकीय यंत्रणा सुसज्ज करून ठेवाव्या, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अॕड. आकाश फुंडकर यांनी दिल्या.
तत्पूर्वी, यासंदर्भात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे सध्याची जिल्ह्याची परिस्थितीची संपूर्ण माहिती महसूल तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून घेऊन प्रशासनाला दिली.
यासंदर्भात खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पातुर तालुका आणि अकोला येथील अनेक भागांमध्ये पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाऊस गेल्यामुळे नुकसान होत असून यासंदर्भात प्रशासनाने पाहणी करावी व सर्व परीने मदत करावी, अशा सूचना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पाटबंधारे विभाग महसूल विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत च्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मयासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन ,कक्षाची स्थापना करण्यात आली असून 24 तास हे कार्यालय सुरू असून नागरिकांनी सतर्क रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये पुढाकार घ्यावा, अशी विनंती पालकमंत्री एडवोकेट आकाश भाऊसाहेब फुंडकर व आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा