अकोला शहराला होणार सात
दिवसाआड पाणी पुरवठा
अकोला : अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्रोत प्रकल्प (महान) असून आज दि. १६.०६.२०२५ रोजी प्रकल्पामध्ये ११.९१ दलघमी एवढा साठा उपलब्ध असून सद्यस्थितीत दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठ्यामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत आहे. त्यामुळे ४ दिवसआड ५ वे दिवशी सुरु असलेला पाणी पुरवठा दि. १७ जुन, २०२५ पासून ६ दिवसआड ७ वे दिवशी करण्यात येत असल्यामुळे ६५ MLD पांट वरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लाॕट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ तसेच २५ MLD वरुन होणारा पाणी पुरवठा जसे शिवनगर, आश्रय नगर व बस स्टॅन्ड मागील जलकुंभावरुन, शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापुर जलकुंभ वरुन होणारा पाणी पुरवठा ६ दिवसआड ७ वे दिवशी करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा