• युवा नाथ संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे
• गजानननाथजी इंगळे यांच्या कार्याचा झाला गौरव
अकोला : येथील पोलीस विभागमधून पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे जेष्ठ नाथ समाजसेवक श्री गजानन नाथजी इंगळे यांना शंखनाद करण्याची आवड आहे. शहरातील प्रत्येक मंदिरांमध्ये जाऊन शंखनाद करीत असतात. ते एक तास चौदा मिनिटे बावीस सेकंद इतका ते शंखनाद करतात. त्यांच्या शंखनांदाची दखल घेऊन वर्ल्ड वाईड बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करून जागतिक स्तरावर पुरस्काराने सन्मानित केले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नाथ समाजाच्या साठी अभिमानास्पद असल्याने त्यांचा युवा नाथ संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अंबादास नाथजी सुरंदसे विदर्भ नाथ संप्रदाय मंडळाचे सचिव व प्रमुख पाहुणे श्री सुधाकर नाथजी पाठक तसेच सत्कार मूर्ती श्री गजानन नाथजी इंगळे हे होते. युवा नाथ संघटनेचे अध्यक्ष श्री राहुल इंगळे, सचिव स्वप्निल पाठक, कार्याध्यक्ष श्री नागेश जाधव, श्री निलेश पाठक, श्री रमेशनाथजी पवार, यश इंगळे, महिला पदाधिकारी सौ राखी तिहीले , सौ रेणुका जाधव यांच्या हस्ते शाल बुके व प्रमाणपत्र देऊन संपत्नीक गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री स्वप्निल पाठक यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष श्री राहुल इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री नागेश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नाथ बांधव व भगिनींची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा