मुख्य सामग्रीवर वगळा

• डॉ.मनिषा पालीवाल करणार
  यंदाही 1100 रोपांचे वाटप 


डाॕ. पालीवाल दाम्पत्यांचा स्तूत्य उपक्रम

•  गत वर्षी 700 रोपांचा संकल्प करून  2000 च्या वर र वाटप


अकोला : 
"राखण्या निसर्गाचा समतोल माप", "झाडं लावा माय बाप" अकोलेकरांना अशी हाक देत, प्रदूषण आणि वाढते तापमान ह्यावर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून वृक्षारोपण करा ही विनंती  वृंदावन नगर अकोला, येथील डॉ. मनीषा पालीवाल यांनी केली. डॉ. पालीवाल दाम्पत्य दरवर्षी वर्षी  रोपांचे मोफत वाटप करतात.  कापडी पिशवी मोफत देतात. 
       आजच्या काळाची गरज म्हणजे पर्यावरण संवर्धन. वाढतं तापमान, प्रदूषण, हवामानाचा लहरीपणा, कधी ओला दुष्काळ तर कधी ढगफुटी ह्या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे वृक्षलागवड व संवर्धन त्यात आपला खारीचा वाटा म्हणून दरवर्षी मोफत रोप वाटत असल्याचे डॉ. मनीषा पालीवाल यांनी बोलतांना सांगितले.
        पर्यावरण प्रेमी व अकोल्यात प्लॅस्टिक विरुद्ध लढ्यासाठी प्रसिद्ध डॉ. मनीषा पालीवाल सतत पर्यावरण रक्षणाचे कार्य करीत असतात.
       रोप वाटप, प्लॅस्टिक निर्मूलनासाठी मोफत कापडी पिशव्यांचे वाटप, शेतकऱ्यांना संबोधन, लहान मुलांना वृक्ष संस्कार, शाळांमध्ये संबोधन, संस्कार शिबीरामध्ये संबोधन, दररोज सकाळी सायकल वारी करून फळे भाजी प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये घेणाऱ्यांना मार्गदर्शन व मोफत कापडी पिशव्यांचे वाटप ह्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान त्या देत असतात.


       एवढेच नव्हे तर लोकांनी प्लॅस्टिक कॅरीबॅग पिशव्या वापरू नये म्हणून त्यांनी घरासमोर फलक लावून ठेवलेले आहे की आमच्या कडून मोफत कापडी पिशवी घेऊन जावे परंतु प्लॅस्टिक पिशवीचा आग्रह फळ/भाजी विक्रेत्याकडे करू नये.

 खालील झाडे रोपांचे केले जाईल वाटप

सीता अशोक ,आंबा, वड ,पिंपळ, उंबर, कडूलिंब, चिंच, जांभूळ, अशोक, पिवळा बहावा, गुलाबी बहावा, पपनस, बेल, कडीपत्ता, शेवगा, प्राजक्त, गुलाब, मनी plant, फुलझाडे व इतर शोभिवंत रोपांचे वाटप करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

          असे तयार करतात रोपे

बियाणे बँकेच्या माध्यमातून जमा झालेल्या बियांपासून व प्लॅस्टिक बँकचे माध्यमातून आलेल्या तेलाच्या व दुधाच्या पिशव्यामध्ये माती भरून शून्य खर्चातून रोप तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय तृतीयेला पाऊचेस मध्ये माती भरून बियाणे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक झाडाची रुजण्याची विशिष्ट वेळ असते त्याप्रमाणे बीज मातीत टाकले जातात, असेही त्यांनी सांगितले. 5 जून पर्यावरण दिनानिमित्य 82 रोप वाटत केल्याचेही त्यांनी सांगितले. 



     प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक

      प्रत्येक घर, प्रत्येक शाळा, ऑफीस व शहरातील प्रत्येक अपार्टमेंट मध्ये एक बियाणे बँक व एक प्लॅस्टिक बँक असायला पाहिजे जेणेकरून सगळेच रोप तयार करू शकतील व मोठ्या संख्येने वृक्षलागवड होईल आणि प्लॅस्टिकचे पिशव्यांची विल्हेवाट लागेल. प्लॅस्टिक बँकेच्या माध्यमातून गोळा केलेले प्लॅस्टिक recycling plant मध्ये पाठवुन टाकावूतून टिकावू काहीतरी निर्माण करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
       सर्वांनी मनात विचार केला तर पाच वर्षात वाढतं तापमान, प्रदूषण, अवर्षण व इतर समस्यांवर मात करणे शक्य होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. त्या प्रत्येकाला सांगत असतात "एक पेड या पौधा जरूर लगाएं, जिससे अगली पीढ़ी सांस ले पाएं"  ज्याला अनेक सुजाण नागरिक चांगला प्रतिसाद देतात.
         पुण्यावरून पोस्टाने येतात सीता अशोक, गुलाबी बहावा, पपनस Tabebuiya avellanedae च्या बिया.  पुण्यात राहणारे श्री. N.V. खडसे सर ह्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आम्ही दरवर्षी मोफत रोप वाटतो, मूळचे अकोल्याचे व सध्या पुण्यात स्थायिक झालेले वृक्षप्रेमी व अभ्यासक श्री.  N.V. खडसे सरांनी डॉ. योगेश पालीवाल यांच्याशी संपर्क साधून पत्ता विचारला व थेट वरील सर्व प्रकारच्या बिया पोस्टाने पाठविल्या, मागच्या वर्षी पासून ते बिया पोस्टाने पाठवीत असतात. 

           ह्यांचे लाभते सहकार्य

      त्यांना ह्या कामात त्यांचे पती डॉ. योगेश पालीवाल सतत सोबत राहून खांद्याला खांदा लावून मदत करीत असतात.  तसेच डॉ. डी. टी. देशमुख, डॉ. महेश डाबरे,पौर्णिमा देशमुख, माया डाबरे, भरत पटेल, सरिता पटेल, भगवान राणे, अनिता राणे हे वेळोवेळी मदत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिक माहितीकरीता व सहकार्या करीता आपणही संपर्क करू शकता संपर्क मो. 832999036

🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓

🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...