• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अकोल्यात
• विविध विकास कामाचे होणार भूमिपूजन
आरोग्य सेेवेपासून तर शेतकऱ्यांची शेती सिंचनाखालील जमीनीसाठी धरणे, रस्ते, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, सर्वसामान्य नागरिकांना बस सेवा, आरोग्यसेवा, मातृशक्तीसाठी महिला बाल विकास भवन,म सर्वोच्च रुग्णालयात नवीन वाढ, अकोला शहरात ऑलम्पिक दर्जाचे जलतरण दर्जाचे बांधकाम, अकोला शहरातील अद्यावत सांस्कृतिक भवन, अकोला तालुका क्रीडासंकुल क्रीडा क्षेत्रासाठी तसेच अकोला तहसील उपविभागीय कार्यालय नवीन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील नवीन इमारत विविध कामे, एसटीपी लेडीज हॉस्पिटल येथे पाण्याची समस्या निराकरणासाठी तसेच मुर्तीजापुर मतदार संघातील बार्शीटाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम, हिवरा कोरडे उपकेंद्र केवी पारद उपकेंद्र सौर ऊर्जा कृषी पाहणी, लोकार्पण, बार्शीटाकळी भेंडी, तसेच पिंजर उपकेंद्र बार्शीटाकळीतील सरेडवा सौर प्रकल्प, हायब्रीड अनुयुटी अंतर्गत अकोट मतदार संघातील राज्यमार्ग क्रमांक ४७ रावेर पाचोरा पिंपळगाव खाडवी जळगाव जामोद हिवरखडे अकोट या मार्गातील रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम, तिन हजार कोटी भूमिपूजन, कोणशीला, लोकार्पणासाठी राज्याचे महायुतीचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे देवा भाऊ फडणवीस राजेश्वर नगरीमध्ये ११ जून बुधवार रोजी दुपारी एक वाजता येत असून या निमित्ताने स्थानिक क्रिकेट क्लब येथे विकास संवाद सभेचे आयोजन केले आहे.
या सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा अध्यक्ष संतोष विजय शिवरकर, जयंत मसने, अग्रवाल, किशोर पाटील यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा