मुख्य सामग्रीवर वगळा


जागतिक क्षितिजावर भारताच्या न्यायपालिकेचा गौरव  नेऊन ठेवणारे न्यायमूर्ती श्री.भूषण गवई

आज 25 जून अमरावती येथे वकील संघाच्या वतीने अमरावतीचे सुपुत्र व देशाचे सरन्यायाधीश मा. श्री.भूषण गवई यांच्या अमरावती येथे प्रथम आगमन प्रसंगी भव्य सत्काराचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. हा सत्कार सोहळा अमरावतीच्या कठोरा रोडवरील पोटे इंजिनिअरिंग कॉलेज च्या स्वामी विवेकानंद या भव्य सभागृहात सायंकाळी 6 वाजता संपन्न होत आहे.ते भारताचे सरन्यायाधीश या सर्वोच्च पदी विराजमान झाल्यानंतर काही दिवसातच बाहेर देशात अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते.  न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी आपल्या दौऱ्यात भारतीय लोकशाहीतील जो मजबूत न्यायपालिका स्तंभ आहे त्याबद्दलचे महत्व संपूर्ण जगाला पटवून दिले. त्याबद्दलचा संक्षिप्त आढावा मी या लेखात घेतला आहे.
अलीकडेच युके मधील लंडन येथे ब्रिटिश इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल अँड कंप्यारेटिव्ह लॉ (BIICL) आणि 39 ऐसेक्स चेम्बर्स यांच्या निमंत्रणावरून 4 जून 2025 रोजी भारताचे सरन्यायाधीश श्री.भूषण गवई यांना व्याख्यानासाठी बोलविण्यात आले होते. व्याख्यानाचा विषय होता "The Roll of Courts in upholding Rule of law in Adjudicating Commercial Disputes " म्हणजे व्यवसाय विषयक वादामध्ये न्याय व कायदा कायम राखण्यात त्याचा अंमल करण्यात न्यायालयांची भूमिका कशी असावी  या विचार प्रवर्तक विषयावर व्याख्यान देऊन उपस्थित सर्व  कायदेपंडीताना मंत्र मुग्ध केले.
या व्याख्यानात त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांचा जागतिक स्तरावर ठामपणे उल्लेख करीत भारतीय न्यायसंस्थेची ऐतिहासिक आणि तात्त्विक बैठक जगासमोर मांडली.न्यायमूर्ती श्री
भूषण गवई यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय समाजव्यवस्थेतील दुर्बल आणि उपेक्षित घटकांचे न्यायहक्क अबाधित राहावेत यासाठी भारतीय संविधानाने दिलेले योगदान किती मोठे आहे, हे स्पष्ट केले. गेल्या ७५ वर्षांत न्यायसंस्थेच्या माध्यमातून समाजात समतेची जाणीव निर्माण झाली आणि भारतीय न्यायव्यवस्थेतील स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि समानता या चार प्रमुख मूल्यांचा विस्तारपूर्वक ऊहापोह केला.
विशेषत: त्यांनी भारतीय न्याय परंपरेचा इतिहास सांगताना कौटिल्याच्या अर्थशास्त्रात उल्लेखलेली राजधर्म व नीतिनियम प्रणाली, तसेच सम्राट अशोकाच्या कालखंडातील न्यायशास्त्राची मानवी मूल्यांवर आधारित रचना, यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारतात हजारो वर्षांपूर्वीपासून न्याय, नैतिकता, आणि मानवतेच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून शासकीय व सामाजिक रचना केली जात होती. अशोकाच्या "धम्म" धोरणात दया, क्षमा, संयम आणि प्रजाजनांसाठी न्याय या गोष्टी मुख्य होत्या. आजच्या न्यायसंस्थेनेही त्या परंपरेचीच आधुनिक पुनरावृत्ती केली पाहिजे, असे त्यांना वाटते.न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारतीय न्यायसंस्थेचा सर्वसामान्य जनतेशी असलेला दृढ संबंध अधोरेखित करीत सांगितले की, राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १९, २१ आणि ३२ ही कलमे प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्रदान करतात. न्यायालये कोणत्याही राजकीय दबावाशिवाय स्वतंत्रपणे काम करतात, हे स्पष्ट करताना त्यांनी अलीकडे भारतात काही राज्यांमध्ये दिसून येणाऱ्या "बुलडोझर न्यायपद्धती"वरही स्पष्ट टीका केली. कोणत्याही व्यक्तीवर खटला न भरता थेट शिक्षा देणे म्हणजेच ‘बुलडोझर न्याय’ असून हे न्यायव्यवस्थेतील मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. “Directions in the matter of demolition of structures” या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या स्पष्ट परवानगीशिवाय कोणतीही इमारत पाडण्याची कारवाई केली जाणे चुकीचे आहे. आरोपी दोषी जरी आढळला, तरी त्याला कायद्यानुसारच शिक्षा दिली गेली पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा न्यायप्रक्रियेत वापर, त्याचे फायदे आणि मर्यादा यावरही विचार मांडले. त्यांच्या मते, भविष्यात AI च्या मदतीने खटल्यांची गती वाढवता येईल, मात्र न्यायाधीशांची विवेकबुद्धी व मानवी संवेदनशीलता ही न्यायदानासाठी अपरिहार्य राहील. त्यांनी डिजिटल इंडिया उपक्रम आणि न्यायप्रणाली यांच्यातील तांत्रिक संबंधावरही प्रकाश टाकला.
 29 मे 2025 रोजी दिलेल्या भाषणात न्यायसंस्थेवरचा वाढता ताण, प्रलंबित खटल्यांची संख्या आणि न्यायप्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता व्यक्त केली.
 न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारतातील नागालँड, मणिपूर, आसाम, अमृतसर आणि झारखंडमधील देवघर अशा ठिकाणी भेटी देऊन स्थानिक न्यायसंस्थांशी संवाद साधला. त्यांनी सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागांतील न्यायप्रवेशाचे वास्तव जाणून घेतले आणि असा मुद्दा मांडला की संविधानात दिलेले हक्क केवळ कागदावरच न राहता ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचले पाहिजेत. हे घडविण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि न्यायसंस्था यांच्यात समन्वय आवश्यक आहे.
न्यायमूर्ती श्री भूषण
गवई यांनी आपले मत ठामपणे मांडले की, कायद्याच्या राज्यात कोणत्याही व्यक्तीवर मनमानी कारवाई करण्याऐवजी त्याला न्यायाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे, हेच लोकशाहीचे खरे स्वरूप आहे. आजही भारतातील सुमारे ७०% जनता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवते आणि हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी न्यायालयांनी अधिक पारदर्शक, जलद आणि लोकाभिमुख व्हावे, असे त्यांना वाटते.न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी न्याय प्रक्रियेतील अलगोरिदमिक बॅलन्स यावर भर दिला. कायद्याचा अलगोरिदम म्हणजे नियमबद्ध निर्णय प्रक्रिया होय.अखेर त्यांच्या भाषणात त्यांनी अधोरेखित केले की लोकशाही केवळ निवडणुकां पुरती मर्यादित नसून, ती न्याय, स्वातंत्र्य, समान संधी आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारलेली असते. भारताचे संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे आणि त्याचे रक्षण करणे हे केवळ न्यायसंस्थेचेच नव्हे, तर या देशातील सर्व जनतेची सामूहिक जबाबदारी आहे.
                      •  रविंद्र दांडगे, अमरावती 
                            संवाद : 9404545238


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...