लोकतंत्र सेनानी सत्कार कार्यक्रम २५ जूनला
अकोला :
जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकतंत्र सेनानीं बंधू तथा भगिनींना कळविण्यात येते की, आणीबाणीच्या ५०व्या वर्षपूर्ती निमित्त लोकतंत्र सेनानी जिल्हासतरीय सन्मान कार्यक्रम दिनांक:- २५/०६/२०२५ बुधवार, सकाळी ठीक:- १०;३० वाजता. कार्यक्रम स्थळ:- शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) नविन बस स्थानका जवळ अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकशाहीचे रक्षण करण्याकरिता ज्या लोकतंत्र सेनानींनी कारावास भोगला, असे सर्व बंधू तथा हयात नसलेल्या बंधूंच्या पत्नी या सर्व सन्माननीय व्यक्तींचा सत्कार भारतीय जनता पार्टी, अकोला महानगर व अकोला जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास विशेष उपस्थिती आमदार रणधिर सावरकर यांची राहणार आहेत. लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष अँड. श्री विजयराव देशमुख उपस्थित राहतील व संघटनात्मक पातळीवर मार्गदर्शन करतील. या सत्कार सोहळ्यात सर्व सन्माननीय आमंत्रित आहात. सत्कार सोहळ्यात सहभागी होऊन सत्कार स्वीकार करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. विनंती.कार्यक्रम दिनांक:- २५/०६/२०२५ बुधवार, सकाळी ठीक:- १०;३० वाजता. कार्यक्रम स्थळ:- शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) नविन बस स्थानका जवळ अकोला, जिल्हा अकोला. संपर्क मोबाईल नंबर:- 8421276196
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा