• स्टेजवर एकाच वेळेस
18 आयएएस, आयपीएस अधिकारी
• शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा कार्यशाळा
• नवीन आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार
लेखक
• डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
संवाद : 98909 67003
अमरावती :
येत्या 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील शेगाव नाका चौकातील अभियंता भवनमध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व नवीन आयएएस विद्यार्थ्यांचा अभिनंदन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्री रामदास पोकळे अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री अनिल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून त्यामध्ये कुमारी अदिबा अनम यवतमाळ डॉ. जयकुमार आडे यवतमाळ डॉ. अभय देशमुख यवतमाळ रजत पत्रे धामणगाव रेल्वे नम्रता ठाकरे वरुड मोहिनी खंडारे बुलढाणा डॉ. अश्विनीधामणकर मंगरूळपीर व डॉक्टर पंकज पटले गोंदिया यांचा समावेश आहे. उपरोक्त सर्व अधिकारी व नवीन आयएएस झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत .तसेच ते विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी पालकांनी व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. गजानन पुंडकर डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व युवा संवाद प्रतिष्ठानचे श्री नितीन पवित्रकार यांनी एका संयुक्त पत्रकाराने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा