मुख्य सामग्रीवर वगळा


महत्व वटसावित्रीचे,करूया रक्षण पर्यावरणाचे

               लेखक

               - चारुदत्त चौधरी

         अ. भा. ग्राहक पंचायत, अमरावती

             संवाद :  9420402122



      प्राचीन भारतीय संस्कृती ही एकूणच समाजहिताला पोषक आहे आणि पर्यावरणाचे रक्षण करणारी आहे. आपल्या या दैदिप्यमान भारतीय संस्कृतीत असणारे विविध सण व उत्सव यामागे लपलेला मूळ गहन आशय लक्षात घेतला,  तर अभिमानाने आपली मान ताठ होते. यात शंकाच नाही. समाजहिताच्या गोष्टी अगदी सहज, एकत्रितपणे, हसत खेळत व परस्पर सहकार्याने घडून याव्यात हीच व्यापक वैज्ञानिक दृष्टी तत्कालीन मान्यवरांची होती. 


      आता आजचे आपले वटसावित्रीचे व्रत बघा. हा सण वटवृक्षाचे पूजन करण्याचा आहे.. वटवृक्षच का निवडला पूजन करण्यासाठी ? तर या अश्वथ वृक्षाचे पर्यावरणीय महत्व अनन्यसाधारण आहे म्हणून. मानवाला नको असलेला कार्बन डाय  ऑक्साईड शोषून घेऊन आवश्यक असणारा प्राणवायू जास्त प्रमाणात हवेत सोडणारा हा वृक्ष आहे. त्याकाळी बहुतेक सगळे पायीच फिरायचे. मधेमधे विश्रांतीसाठी मग मोठी सावली देणारा वटवृक्षच  हवा.  मोठा वृक्ष म्हणजे पक्ष्यांचे हक्काचे आश्रयस्थानच असायचे. मग जास्त संख्येतील पक्षी मंजुळ किलबिल करत पांथस्थाला प्रसन्नतेची अनुभूती देत असत. ताजातावाना होत मग प्रवासी पुढच्या प्रवासाला निघायचा. जनावरेसुद्धा उन्हात,पावसात वटवृक्षाच्या आश्रयाला असायची. वटवृक्षाची खोलवर जाणारी मुळं जास्त पाणी धरून ठेवतात व जमिनीची धूप थांबते. याच्या पारंब्यांपासून पुन्हा आपोआप नवीन वटवृक्ष तयार होतात.  म्हणून याला अमर वृक्ष असेही संबोधतात.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे हे अनेक वृक्ष त्या स्थानाला एक वेगळेच सौन्दर्य बहाल करतात. त्याचे पर्यंटनात  देखील खूप महत्व आहे. त्याकाळी बहुतेक घरातच राहणाऱ्या स्त्रियांनी छान नटून थटून बाहेर पडावे , परस्परांशी मोकळा संवाद साधावा, आपल्या जोडीदाराच्या आयुष्यासाठी प्रार्थना करावी, प्रसन्न आणि उत्साहवर्धक वातावरण सभोवती अगदी सहजगत्या असावे असा छान दृष्टिकोन यामागे होता.   प्राचीन आयुर्वेदातसुद्धा सांगितले आहे की या अक्षयवटाची पाने, चीक, मुळं,साल, पारंब्या वगैरेचा उपयोग पत्रावळीसाठी,समिधांसाठी, चेहऱ्यावरील कांतीसाठी, केशवर्धनासाठी, विषाच्या उताऱ्यासाठी, मधुमेहासाठी, ताप व जंत यावरील उपचारासाठी, खाज, रक्तस्त्राव यावर उपचार म्हणून केला जातो.

       अशा अनेक गोष्टींचा साधक बाधक विचार करून अमर असणाऱ्या या वटवृक्षाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून भारत सरकारने 1950 साली घोषित केले गेले. 

आज गिनीज बुक मध्ये नोंद असलेला आंध्र प्रदेशातील कादिरी गावातील वटवृक्ष असून त्याचा विस्तार 19107 चौरस मीटर आहे. गुजरात मध्ये कबीरवड प्रसिद्ध असून त्याची उंची 95 फूट आहे.

      त्या काळातील काही कहाण्या, काही प्रथा जर आज कालबाह्य वाटत असल्या तर त्यांचे स्वरूप आपण नक्कीच बदलू शकतो. पण  त्या काळातील वाटसावित्रीचा मूळ आशय म्हणजे पर्यावरण रक्षण हा आजही महत्वाचा आहे हे सत्य आपण आजही नाकारू शकत नाही. म्हणून ठिकठिकाणी नवीन वटवृक्ष लावून त्यांचे संवर्धन करून दाखवावे हीच शिकवण हा वटसावित्रीचा सण देतो असे म्हणावेसे वाटते.

               - चारुदत्त चौधरी

       अ. भा. ग्राहक पंचायत, अमरावती

         संवाद :  9420402122



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...