• डॉ. संदिप चव्हाणांप्रमाणेच होमिओपॅथीक प्रॅक्टिस करतांना अभ्यासूवृत्ती ही जिवंत असणे गरजेचे
• डॉ. रवि भोसले यांचे गौरोद्गार
• माजी केंद्रीय होमिओपॅथीक परिषदेचे सदस्य डॉ.रवि भोसले यांची डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट !
अकोला :
डॉ.हॅनेमन जिवन गौरव पुरस्कार प्राप्त, माजी केंद्रीय होमिओपॅथीक सदस्य, सावकार होमिओपॅथीक कॉलेजचे मा.प्राचार्य, धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.रवि भोसले यांचे अकोला येथे आगमन झाले असता डॉ.चव्हाण होमिओपॅथीक क्लिनिकला सदिच्छा भेट दिली.
यावेळी होमिओपॅथीक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला, यावेळी त्यांनी डॉ. संदिप चव्हाण यांच्याप्रमाणे होमिओपॅथीक प्रॅक्टिस करतांना अभ्यासू वृत्ती ही जिवंत असणे गरजेचे आहे, असे गौरोद्गार डॉ. रवि भोसले यांनी काढले,
यावेळी प्रामुख्याने होमिओपॅथीचे नेते तथा मार्गदर्शक डॉ.किशोर मालोकार, महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ.राजेश अग्रवाल, वैद्यकीय आघाडी महानगर सहसंयोजक डॉ.नरेश गोंड उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा