मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्य




आहार सुयोग्य असेल तर औषधांची 
गरजच नाही
          
अकोला : 
आहार जर सुयोग्य असेल तर औषधांची गरजच भासत नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्या कारणांमध्ये आहारविषयक चुका हे सर्वांत जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून विचार करायच्या आधी आहारीय बदल महत्त्वाचा ठरतो,असे डॉ. प्रमोद ढेरे, निसर्ग उपचार तज्ञ यांनी म्हटले आहे.
      काय खावं, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावं, जेवताना कसं बसावं, आहारात पदार्थ काय असावेत, त्यामध्ये किती रसांचा (कडू, तुरट, गोड, खारट, आंबट आणि तिखट अशा चवींना आयुर्वेदात रस असे म्हटले जाते.) समावेश असावा या गोष्टी यामध्ये येतात.
      आपल्या शरीराचं वजन दोन प्रकारचं असतं- चरबीचं वजन आणि स्नायू - हाडांचं वजन. वजन काट्याकडे बघून स्वत : च्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत नाही. आपल्या शरीरातल्या चरबीचं वजन किती आहे (शरीरात चरबीचं प्रमाण किती आहे) हे एकूण वजन किती आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. एकूण वजनात चरबीच्या वजनाचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जात नाही आणि आपण उगाच डाएट च्या मागे लागतो. 
            अतिरेकी डाएटच्या मागं कधीही लागू नका, त्यांचा फारसा उपयोग नसतो आणि ती पाळणंही अवघड असतं.सर्व खाल्लं पाहिजे. खाद्यपदार्थांवर 'दैवी','असुरी' असे शिक्के मारू नका, सर्व पदार्थ तुमच्यासाठी तेवढेच चांगले किंवा वाईट असतात. प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, तसं प्रत्येक व्यक्तीचं डाएटही वेगळं असलं पाहिजे. दुसऱ्या कुणाचं तरी डाएट, व्यायाम याचं अनुकरण करू नका. लो-फॅट किंवा शुगर फ्री पदार्थांत नेमकं काय असतं ते माहीत करून घ्या.
        तसे सगळेच पदार्थ आरोग्यदायी असतात, असं नाही आणि ते (कधीही) प्रमाणाबाहेर खाऊ नका. व्यायामाला पर्याय नाही. कितीही चांगली आहारपद्धती असली, तरी व्यायाम केल्याशिवाय हवा तो परिणाम साध्य करता येणार नाही. कधीही डाएटवर जाऊ नका त्याऐवज्जी जीवनशैली बदला. डाएटिंग म्हणजे उपासमार नव्हे वजन कमी करायचं असेल किंवा शरीराची झीज भरून काढायची असेल तर खाल्लं पाहिजे.

                    
        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...