मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक मीणा यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन
अकोला : अकोल्याचे तत्कालीन एस.पी. तथा मुंबई येथील दहशतवादविरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मीणा साहेब यांनी आज सकाळी येथील अतिप्राचिन श्री राजराजेश्वर मंदिराला भेट देवून श्री राजेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा श्री राजेश्वर संस्थानतर्फे शाल, श्रीफळ व श्री राजेश्वराची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी, आगमन होताच माऊली बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. हरिश बुंदेले आणि ज्येष्ठ पत्रकार विजय केंदरकर यांनी त्यांचे स्वागत केले. श्री पिंपळकर,संस्थानमधील पदाधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तदनंतर, श्री राजेश्वराला त्यांनी पूजा-अर्चा,अभिषेक करुन दर्शन घेतले.
अकोल्यात असतांना मीणा साहेब दर सोमवारी सातत्याने श्री राजेश्वराचे दर्शन घ्यायचे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा