• जिल्हा कारागृहात बंदिवानांकरिता योगदिन उत्साहात
• प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवावे लागतात - योगगुरु मनोहर इंगळे
अकोला :
बंदिवानांची मानसिकता सुधारणे,याकरिता योग अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जिवनात आलेले भोग हे भोगूनच संपवावे लागतात ते भोग आपणच तयार केलेले आहेत, असे योगगुरू मनोहर इंगळे योगदिनानिमित्य बंदीवानांसमोर बोलत होते.
जिल्हा कारागृह अकोला येथे बंदिवानांकरिता योग दिवसाचे आयोजन कारागृह प्रशासनाने केले होते.
त्यात सर्व प्रथम जिल्हा कारागृह अधिक्षक कैलास काळे यांनी योगाचे महत्व विषद केले. त्या प्रसंगी कारागृह वरिष्ठ अधिकारी मीरा बाबर, महेंद्र जोशी, सूनील सुभेदार अनुराधा इंगळे, शिवतेज इंगळे, अरूण देशमूख व इतरही जिल्हा कारागृह अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुरूष बंदिवानांकडून योगगुरू मनोहर इंगळे यांनी मागिल गेल्या १५ दिवसांपासूनच योगाचा सराव सूरू होता. त्यात प्राणायाम, आसन व ध्यान धारणा घेण्यात आली.
महिला बंदीवानांकडून सौ. अनुराधा मनोहरराव इंगळे यांनी सराव करून घेतला.
बंदिवानांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडावा, या साठी कारागृह प्रशासन व शिवतेज प्रतिष्ठान यांचे कडून वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात. शांती पाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा