• पन्नास वर्षांची स्वप्नपूर्ती !
• अनुप आलिमचंदानी यांनी घेतली
धर्मेंद्र यांची भेट
अकोला :
एकेकाळी चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र यांचे चाहते असलेले अकोल्यातील उद्योजक अनुप आलिमचंदानी यांनी त्यांचा एकही चित्रपट असा नाही की त्यांनी तो बघितला नाही. त्यांना भेटण्याची त्यांच्यात प्रचंड ओढ होती. मात्र ५० वर्षानंतर त्यांची धर्मेंद्र यांना भेटण्याची स्वप्नपूर्ती फळाला आली. त्यांच्या भेटीने आलिमचंदानी कुटुंब भावविवश झाले. अकोल्यातील उद्योजक अनुप अलीमचंदानी यांची पन्नास वर्षांपासूनची तपश्चर्या अखेर पूर्णत्वास आली, ती लोणावळा येथे प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांची झालेल्या सदिच्छा भेटीतून.
धर्मेंद्र यांचे कट्टर चाहत्यांपैकी एक साधेपणाने भारावले अलीमचंदानी कुटूंब
धर्मेंद्र यांनी सर्वांच्या स्वागतात आत्मीयता दर्शवत, अनुप यांच्या व्यवसायातील यशाचे व त्यांच्या जीवनातील शिस्तबद्ध वाटचालीचे मनःपूर्वक कौतुक केले. या भेटीत दोघांमध्ये सिनेमा, समाज, कुटुंब मूल्ये आणि आयुष्याच्या अनुभवांवर खुला संवाद साधला गेला.
धर्मेंद्र यांचे साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने आलिमचंदानी परिवार भारावून गेला. अनुप आलिमचंदानी यांनी आजवर त्यांचा एकही चित्रपट. चुकवलेला नाही. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने त्यांच्या मनावर अधिराज्य केले. प्रेमाने जपलेला हा चाहता वर्गाचा ऋणानुबंध अखेर प्रत्यक्ष भेटीत बदलला.
यावेळी धर्मेंद्र यांनी तुमच्या सारख्या चाहत्यांमुळेच मी आज ठणठणीत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या खास प्रसंगी अनुप अलीमचंदानी यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब उषा अलीमचंदानी, निकिल अलीमचंदानी, दान्या अलीमचंदानी, निकिल वलेचा, सौम्या वलेचा, दीपिन अलीमचंदानी, हानविका अलीमचंदानी, संदीप अलीमचंदानी, नक्ष अलीमचंदानी आणि दियान बलेचा, हे देखील उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा