मुख्य सामग्रीवर वगळा


         


प्रा.डॉ.मोहन खडसे यांचं गुपित आनंदाचं !

                            समीक्षक

                         तुळशीराम बोबडे
                   संवाद : 94097147809

    प्रत्येक व्यक्ती सुख आनंद शोधत असतो. पण खरं सुख माणण्यात असते. ते एक गुपित असते आपणा सर्वांना एक सुंदर कथा माहित असेलच की, एक व्यक्ती सुखी होण्यासाठी सुखी माणसाचा सदरा शोधत असते. तो खूप मोठं मोठ्या व्यक्तीकडे जातो. लखपती, अरबोपती, उदयोगपती पण कुणीच सुखी नसतो. कुणालाच शांत समाधानाची झोप लागत नसते. कुणाला कश्याची तर कुणाला कश्याची चिंता असते. शोधत शोधत तो थकून एके दिवशी एका शेतात गाढ झोपलेल्या माणसांजवळ जातो .  व तो झोपेतून जागा झाल्यावर त्याला म्हणतो तुम्ही सुखी समाधानी दिसत आहात.  कारण इथे बेड, उशी नसताना तुम्ही शांत, चिंतारहित झोपला होता. ती व्यक्ती उत्तर देते,  हो मी सुखी समाधानी आहे.  मला जे मिळाल त्यात मला समाधान आहे. शोधणारी व्यक्ती म्हणते तुमचा सदरा मला कृपा करुन द्या.  तर उत्तर येते भल्या माणसा माझ्या अंगात तुला सदरा दिसून राहला का? माझ्याकडे सदराच नाही असं दिसून  आलं की ज्यांचेकडे सर्व काही आहे, सदरा आहे ते सुखी समाधानी नाहीत व जे समाधानी आहेत त्यांच्याकडे सदराच नाही.  तात्पर्य,  सुख आनंद माणण्यात आहे.


 माणूस सकारात्मक विचार करणारा असावा आणि हाच मुद्दा घेऊन प्रा. डॉ. मोहन खडसे यांनी गुपित आनंदाचं,  हे वैचारिक लेखाच पुस्तकं लिहलं आहे.   यांचं हे सहावं पुस्तकं आहे.  यातील सर्व लेख सकारात्मकता बिंबवण्याचा प्रयत्न करतात हेच आहे गुपित आनंदाचं.
   आनंद जबाबदारीचा असतो, प्रयत्नाचा असतो, कचऱ्यातून सुगंध निर्माण करण्यात असतो.  संयम, पारख, कृतज्ञता संघर्ष, विनम्रता, निसर्ग आनंद, व्यस्त राहणं, सकारात्मक असणं, छन्द जोपसणं, प्रार्थना करणं, संतुलन संयम, समन्वयं साधनं हे सर्व आहे गुपित आनंदाचं .
       एका लेखात एक सुंदर शेर आला आहे
 चाहे कितनी सजालो तस्वीरे आईनेके लीये एक जगह रखना दोन ओळीत खूप मोठा आशय आला आहे. आपले विविध मुद्रेतले, विविध कोनातले, विविध पोशाखतले फोटो खूप सुंदर असू शकतात. पण आपला खरा चेहरा आपल्याला आरसाच दाखवू शकतो.  खरं  म्हणजे स्वतःला स्वतःच्या अंतरात्मात शोधावं ती खरी आपली तस्वीर. गरज ही शोधाची जननी आहे गुगल कपंनीचे वरिष्ठ अधिकारी सुंदर पिचई यांनी अश्याच एका प्रसगातून संदेश घेत जगाला उपयोगी मॅप चा शोध लावला. यशाचे नाते शिफारस यापेक्षा श्रम, गुणवत्ता, योग्यता, यात असते असं लेखक एका लेखात नमूद करतात व ते तंतोतंत खरं आहे
    आँखे भी खोलनी पडती है उजालेके लिये केवल सूरज निकलनेसे अंधेरा नहीं चला जाता.
      मनासारखं नेहमीच घडून येत नसते हा सकारात्मक संदेश लेखक देऊन जातात. आपल्या प्रमाणे इतरांचाही विचार आपण करावा.  त्यांच्या भूमिकेत आपण शिरून पहावे. असा महत्वपूर्ण संदेश लेखक देऊन जातात.  त्यामुळे वाचक सकारात्मक बनतो असे कितीतरी आयुष्यात सुखी आनंदी होण्याचे मंत्र लेखकांने ५१लेखात दिले आहेत. प्रा. डॉ. मोहन खडसे हे केवळ लिहून थांबले नाहीत, तर हे लेख त्यांनी जीवनात उतरवले आहेत.  एक माणूस म्हणून त्यांचा खूप मोठा लौकिक आहे. पत्रकारितेतले असूनही विनम्रता आहे.   प्रसंगी कठोरताही ते धारण करतात.  लेखकांनहे गुपित आपल्यासाठी खुलं केलं आहे त्याबद्दल त्यांना नमन व भावी लेखणासाठी शुभेच्छा...


          









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...