मुख्य सामग्रीवर वगळा


• "सायबर सुरक्षा अभियानमध्ये"

•   शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची  निवड

अकोला: येथील शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज अकोला येथील बी.सी.ए व बी.एस.स्सी (कंप्युटर सायन्स) विभागातील चार विद्यार्थ्यांनी क्विक हिल फाउंडेशन, विमाननगर, पुणे येथे आयोजित "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या विशेष प्रशिक्षण सत्रात यशस्वी सहभाग नोंदविला. 


       सायबर सुरक्षा विषयक जनजागृती आणि प्रशिक्षण हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. याकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.         या अभियानासाठी कॉलेजच्या सायबर क्लब ऑफिसर्स म्हणून प्रेसिडेंट रोहन सर्जेकर, सेक्रेटरी प्रणाली पिंपळकर, कम्युनिटी डायरेक्टर पूर्वा ताथे, डायरेक्टर पी.आर. मीडिया व अनिकेत फुके यांची निवड करण्यात आली. 
        या प्रशिक्षणात क्विक हिल फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक अजय शिर्के व गायत्री केसकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन फ्रॉड, सोशल मीडियातील धोके, पासवर्ड मॅनेजमेंट आणि डेटा प्रोटेक्शन यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. क्विक हिल कंपनीच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करताना सांगितले की, “तरुण पिढी जर सजग झाली, तर सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्याची मोठी संधी निर्माण होईल.”
       या प्रशिक्षणाचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे, विविध सामाजिक घटकांना डिजिटल साक्षर बनवणे आणि सायबर अवेअर शहर निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी या मोहिमेच्या पुढील टप्प्यात शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, महापालिका आणि विविध संस्थांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...