मुख्य सामग्रीवर वगळा

कलेक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

 महाराष्ट्र शासनाची विनामूल्य प्रशिक्षण योजना




अमरावती :    महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नरत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने िक ठिकाणी आयएएस प्रशिक्षण केंद्रे उभारली आहेत. या ठिकाणी कलेक्टर होणाऱ्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते तसेच त्यांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था व विद्यावेतन देण्याची देखील तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे. महाराष्ट्र शासनाची ही केंद्रे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती येथे उपलब्ध आहेत. या सर्व केंद्रावर कलेक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी एक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र शासनाने आयोजित केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा यांना लाभ घ्यावयाचा आहे व या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा द्यावयाची आहे त्यांनी अधिक माहितीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावयाची आहे. ह्या सर्व केंद्रा साठी एक सामायिक परीक्षा पुढील महिन्यात होणार आहे त्यासाठी ताबडतोब अर्ज दाखल करावे याचे आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोर मुंबईच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अमरावतीचे केंद्र हे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे जुने विदर्भ महाविद्यालय येथे असून नागपूरचे आयएएस केंद्र हे बर्डी वरील झिरो मैल चा परिसरात आहे तसेच मुंबईचे केंद्र हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील हजारी मल मार्गावर आहे कोल्हापूरचे केंद्र हे राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात असून या सर्व केंद्रांमध्ये हजारो विद्यार्थी आयएएस चे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा व त्यासाठी या विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मिशन आय ए एसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. यात महाराष्ट्रातील या केंद्रातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन आयएएस आयपीएस झालेले आहेत. या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध असून आयएएस ला उपयुक्त असे सर्व उपक्रम या सर्व केंद्रांमध्ये सातत्याने राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील आयएएसची टक्केवारी वाढवण्यासाठी हे सर्व केंद्र उपयुक्त आहेत. अशा प्रकारची आयएएस प्रशिक्षण केंद्रे प्रारंभ करून महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने आयएएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक उपयुक्त असे दालन उपलब्ध करून दिले आहे .त्यासाठी महाराष्ट्र शासन हे अभिनंदन आज पात्र आहे.

             •   प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

संचालक, मिशन आयएएस अमरावती कॅम्प संवाद 9890967003


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...