आषाढीयात्रेनिमित्त महामंडळ ५ हजार २०० विशेष बस सोडणार
एकत्रित मागणी केल्यास गावातूनही थेट एसटी बस उपलब्ध करून देणार
पंढरपूर :
आषाढीयात्रेनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आषाढीएकादशी च्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत दिली.
आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा