मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा - परमानंद महाराज

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या दोन दिवशीय केडर कॅम्पची उत्साहात सुरुवात

शिर्डी  (प्रतिनिधी)

पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे, तर दिशा देणारी असावी. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्ये आणि हेतू विसरता कामा नये. बातमी मागची भूमिका ही समाज घडवणारी असावी. पत्रकारिता ही एक साधना आहे. संतांची शिकवण, ध्यान, आणि आत्मजागृती यांचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे.

पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा, असे आवाहन आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावन भूमीत दोन दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज, आ. अमोल खताळ, संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांच्या हस्ते झाला.



         पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे साधन नाही, तर ती एक शास्त्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता म्हणजे राष्ट्रीय उभारणीचे एक माध्यम होते. त्या काळच्या छपाईपासून ते डिजिटल लाईव्ह पर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला आहे. पण दर्जा टिकवणे हे फार मोठं आव्हान बनलं आहे. पत्रकारितेतील स्पर्धा, वेळेचे बंधन आणि तणाव यामुळे अनेकदा बातमीला विचारांचा आणि मूल्यांचा अभाव राहतो. आत्मशोध आणि ध्यान हे केवळ वैयक्तिक शांतीसाठी नाही, तर पत्रकारितेतील गुणवत्तेसाठी देखील आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, "प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी दिवसातील फक्त पंधरा मिनिटे दिली, तर पत्रकार आणि माणूस म्हणून अधिक स्पष्ट, स्थिर आणि समंजस होईल."

आत्मा म्हणजेच ती चेतना जी आपल्या कर्मात, विचारात आणि शब्दात प्रकट होते. शब्द हे राष्ट्रनिर्मितीचे साधन आहेत. तेच शब्द अज्ञान नष्ट करू शकतात आणि लोकशाही सुदृढ करू शकतात, असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ म्हणाले की, "पत्रकारिता हा एक अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे. पत्रकार हे समाजाचे दर्पण असतात." महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे आश्वासन दिले होते. "मी एक त्यांचा शिलेदार म्हणून नक्कीच त्यांच्यापर्यंत हे आश्वासन पोहोचवेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे म्हणाले की, "पत्रकार हा सत्याचे आणि खोट्याचे विश्लेषण करणारा असतो, आणि ज्ञानाचा स्रोतही असतो. ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी ही कार्यशाळा फार उपयुक्त ठरेल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सरकार किंवा समाजातील महत्त्वाच्या गोष्टींवर पत्रकारांनी प्रकाश टाकला पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे कार्य सर्वासमोर प्रस्ताविकातून ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले. या वेळी  समाजशास्त्राच्या अभ्यासक प्रा. सविता गिरे पाटील, आत्मा मलिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी, महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी, जोतिषाचार्य जयंत पारधी गुरुजी, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्यसेल प्रमुख भीमेश मुतुला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, सविता चंद्रे संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो ओळ: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिक दोन दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज, आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.) 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...