मुख्य सामग्रीवर वगळा


•  भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान!
 
•  जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा इशारा

•   या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव




अकोला : 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ताज्या अहवालामुळे आपल्या जेवणाची चव कमी होऊ शकते. WHO च्या या अहवालानुसार, जगभरात जवळपास 18 लाख 90 हजार लोक मिठाच्या (Salt) अधिक सेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. 
       या अहवालानुसार, जगातील केवळ 3 टक्के लोकच मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करीत आहेत, हे वास्तव आहे.



     गरजेपेक्षा अधिक मिठाचे 
    सेवन जीवघेणे

        या अहवालानुसार, आवश्यकतेपेक्षा अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर 10.8 ग्रॅम एवढा आहे. तर WHO ने प्रति व्यक्ती मिठाच्या वापराची कमाल मर्यादा 5 ग्रॅम एवढी निश्चित केली आहे. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकत, 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी हे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षाही कमी करायला हवे आणि लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी असावे, अशी शिफारस WHO ने केली आहे.
 


       हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी
        केले जाऊ शकतात

       WHO नुसार, जर मिठाचे प्रमाण कमी करता आले तर जगभरात दर वर्षी हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी केले जाऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, मिठाचा वापर कमी केलास, 2025 पर्यंत 22 लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि 2030 पर्यंत जवळपास 70 लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. जे सध्या अधिक मिठाच्या सेवनामुळे हृदयरोगी बनत चालले आहेत, असा WHO चा अंदाज आहे. अर्थात सध्या होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.

       भारताला मिळाले असे रेटिंग...

      या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर 1 ते 4 दरम्यान आहे. 
      1 सबसे म्हणजे सर्वात कमी आणि 4 म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. 1 मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. 2 स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे. भारताचा स्कोर दोन आहे. 3 स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 4 स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले. 

        WHO चा इशारा...

      WHO नुसार, भारतात पाकीट बंद अन्ना वर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक  मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही. मग, पॅकेज्ड फूड मगते चिप्स असोत अथवा कुठलाही पदार्थ, त्यात प्रमाणापेक्षा अधिक मिठ टाकले जाते. मिठ एक एडिक्टिव अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. तसेच जे अन्न अधिक चटपटीत असते, त्याची सवय फार लवकर लागते. याच धारणेने बाजारात अधिक चटपटीत मसाल्यांचे चिप्स, नमकीन आणि बिस्किटांची विक्री केली जाते.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...