• योगगुरु मनोहरराव इंगळे यांची माहिती
•निरोगी आयुष्यासाठी योगासन खूप महत्वाचे
अकोला :
निरोगी आयुष्यासाठी योगासन खूप महत्वाचे आहे. योगामुळे शरीरात उर्जेचा संचार होतो आणि निरोगी राहण्यास मदत होते. योगाचे हे महत्त्व समजावून सांगण्यासाठी 21 जून रोजी देशात आणि जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. खरं तर, योग हा शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा एक विशेष भाग आहे आणि तो बरे करण्याचे एक प्रभावी साधन मानले गेले आहे,असे येथील प्रख्यात योगगुरु मनोहरराव इंगळे यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्व विषय करतांना सांगितले.
भारताच्या पुढाकाराने योगाची ताकद ओळखून जगभरात योगाला महत्त्व दिले जाते. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला होता. ज्यामध्ये वर्षातील कोणत्याही एका दिवसाचे नाव योग असे म्हटले होते. पंतप्रधानांचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने स्वीकारला. ठराव मंजूर झाल्याने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला. ज्याचे नेतृत्व भारताने केले. या दिवशी दिल्लीतील राजपथावर 35,000 हून अधिक लोकांनी योगा केला, ज्यामध्ये 84 देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. या घटनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
श्री मनोहरराव इंगळे पुढे म्हणाले, ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो. आपल्याला आंतरीक शांती प्राप्त होते आणि आसपासच्या परीस्थितीवर प्रभाव करू शकतो.
भावनिक लवचिकता वाढते
प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते. हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा मार्ग आहे
शांत परिसर
शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता.
नियमित ध्यान करा
दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा
यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल.
विचारांचे निरीक्षण करा
विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा