अकोला : श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे राजेश्वर नगरी अकोला येथे 21 जून रोजी आगमन होणार आहे. सर्व भक्तांसाठी भाग्याचा क्षण! आता भगवान शिवाचे पहिले ज्योतिर्लिंग - श्री सोमनाथ महादेवाचे अकोला शहरात आगमन होत आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग अकोला आणि वैदिक धर्म संस्था यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तेच पवित्र ज्योतिर्लिंग आता अकोल्यात येत आहे! ही एक दुर्मिळ संधी आहे - दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तारीख: २१ जून दर्शन.. ठिकाण: राजेश्वर मंदिर, अकोला. वेळ : संध्याकाळी ५ ते रात्री १० वा. पर्यंत.परिवारासह दर्शनासाठी या! हा शुभ सोहळा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. जय भोलेनाथ!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा