मुख्य सामग्रीवर वगळा

 


• आ. रणधीर सावरकरांचे निर्देश

• असामाजिक तत्त्वावर वचक निर्माण करुन कारवाई करा

अकोला :

 अकोला शहरामध्ये वाढत्या  चोय्रा, घरफोड्या, अवैध धंदे, तसेच वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून यासंदर्भात पोलीस प्रशासनाने दखल घेऊन असामाजिक तत्त्वावर वचक बसवावा.  कारवाई करावी,  असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी येथे दिले. 

       शहरावर व जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे खंबे, तार, विविध साहित्य चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून यासंदर्भात पोलीस प्रशासनाने शीघ्र गतीने, अशा चोरी करणाऱ्यांना  जेरबंद करावे.  तसेच वाढती गुन्हेगारी, वाढते अवैध धंदे, तसेच वाढत्या घरफोडी यासंदर्भात एक पथक निर्माण करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या संदर्भात कारवाई करावी.   याबद्दल दक्षतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा केली.

     कायदा सुव्यवस्था सोबत असामाजिक तत्त्वावर कारवाई करण्याच्या संदर्भात निर्देश दिले आहेत. 

यावेळी त्यांच्यासोबत विजय अग्रवाल, राजेश बेले, जयंत मसने, किशोर मांगटे पाटील, माधव मानकर, अमित  कावरे, अंबादास उमाळे, गिरीश जोशी, एडवोकेट देव, आशिष काकड, पंकज वाडीवाले विवेक भरणे, संदीप गावंडे, गणेश अंधारे, गणेश सारसे, प्रवीण  हगवणे, गणेश तायडे, किशोर कुचके, विपुल घोगरे, रंजीत खेडकर, उपस्थित  होते.

     यावेळी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे जून महिन्यामधील  दुसऱ्या आठवड्यात आगमन होत असून या संदर्भात कायदा सुव्यवस्था सोबत व सामाजिक तत्त्वावर तसेच अवैध धंद्यांवर व वाढत्या चोरीवर वचक बसवण्याची निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...