पक्षांसाठी जलपात्राचे वितरण
सुनील गोहर यांच स्तूत्य उक्रम
अकोला : सामाजिक कार्यकर्ते सुनील गोहर यांनी पशुपक्षांप्रती आपुलकी व्यक्त करीत यंदा जलपात्र वाटपाचे उपक्रम राबविले़़ पक्षीरक्षा उपक्रमांत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने शहराच्या विविध भागात पक्षी जलपत्राचे वितरण केले आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या ताजनापेठ येथे आयोजित कार्यक्रमाला, ललित भगत, संदीप रामचवरे, केशव तायडे संजय महाजन बाळकृष्ण महाजन निसार भाई, युसुफभाई, आदींच्या प्रमुख उपस्थितीत पक्षी जलपत्राचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सुनील गवारे यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो वृक्षारोपण कार्यक्रमास सोबतच वृक्षांवर जलपात्र बांधण्यात येते.
समाजसेवेसह शैक्षणिक सामाजिक आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असणारे सुनील गोहर हे गेल्या काही वर्षांपासून पक्षांसाठी जलपात्राचे वाटप नित्य नियमाने करतात यंदाही त्यांनी दीड हजार जलपात्राचे वितरण करून रखरखत्या उन्हात पक्ष्यांचे तहान भागवण्याचे कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा