मुख्य सामग्रीवर वगळा

 


चला दहावी बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू या       


  
          

           हावी बारावीचा निकाल लागल्यानंतर  प्रत्येकाला पुढे काय करायचे  हा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बेरोजगाराची संख्या वाढत आहे. बेरोजगारांचा प्रश्न भेडसावीत आहे. सुशिक्षित बेकारीची संख्या वाढत आहे. पण युवकांनी अगदी प्रमाणिकपणे प्रयत्न  केल्यास त्याला  प्रशासनात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक सातत्याने व  आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे .           

                ध्येय ठरवा  

विद्यार्थ्यांनी पुढे चालून आपल्याला काय व्हायचे आहे हे ठरविले पाहिजे व त्यादृष्टीने आपला जीवनक्रमाची आखणी केली पाहिजे. प्रत्येक मुलाला डॉक्टर इंजिनीयर व्हावेसे वाटते. पण आपली आर्थिक मानसिक व शैक्षणिक परिस्थिती कशी आहे .त्याचाही विचार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी केला पाहिजे. केवळ इतर जातात किंवा या दोन व्यवसायाला क्रेझ आहे म्हणून त्याकडे वळू नये. म्हणून सर्व प्रथम ध्येय निश्चित करा. तुम्हाला ज्या क्षेत्रात खऱ्या  अर्थाने आवड आहे .त्या क्षेत्राची निवड करा.        


    

          स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय                  

 माझ्या मते स्पर्धा परीक्षा हे ध्येय विद्यार्थ्यांनी ठरविले पाहिजे .या माध्यमातून पटकन एक रुपयाही खर्च न करता नोकरी मिळू शकते .आज विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाते .आय ए एस . एम पी एस सी. बँकिंग रेल्वे .स्टाफ सिलेक्शन असे कितीतरी पर्याय आहेत. पण या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षापासून जर केला तर तो विद्यार्थी पदवी परीक्षेत नंतर एकच वर्षात नोकरी मिळवू शकतो. पण  त्यासाठी जिद्दीने सातत्याने नियोजन बद्ध अचूक प्रयत्न करण्याची गरज आज आहे. 

          आपले व्यक्तिमत्व घडवा 

विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे  .तो तत्पर तेजस्वी व तपस्वी असला पाहिजे .अभ्यासात प्रगती केलीच पाहिजे .पण त्याचबरोबर भाषणे वाद-विवाद गटचर्चा क्रीडा गायन बुद्धिमत्ता चाचणी मुलाखत तंत्र या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मुलाखतीला समोरे जावे लागते. त्यासाठी व्यक्तिमत्व घडविणे गरजेचे आहे .       


      

           रोज 30 प्रश्न सोडवा                                   

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात व इतरत्र जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोज 30 प्रश्न सोडविण्याचा सराव केला पाहिजे .रोजचे 30 तर महिन्याचे 900 एका वर्षाचे 10800 प्रश्न सोडवून होतील. एमपीएससीला प्रश्न येतात फक्त 200 आणि यूपीएससी ला प्रश्न येतात फक्त 180.जो विद्यार्थी तीन वर्ष रोज 30 प्रश्न सोडवेल त्याचे प्रश्न सोडून होतील 33000.  तो विद्यार्थी ह्या परीक्षा सहज पास होऊ शकेल. फक्त सातत्याने सराव करीत राहणे गरजेचे आहे.  

           शासकीय संस्था                                 

      महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे .त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारली आहेत. तिथे प्रशासनाची निवासाची भोजनाची व विद्या वेतनाची सोय उपलब्ध करून दिली आहे .मुंबईला एस आय ए सी  पुण्याला यशदा कोल्हापूर औरंगाबाद.आमरावती नाशिक ठाणे व नागपूर येथे एस आय ए सीच्या शाखा कार्यरत आहेत. तिथे सर्वसाधारणपणे प्रत्येक बॅचला 60 मुलांना प्रवेश दिला जातो. इथे विद्या वेतनही मिळते. याशिवाय प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र आहेतच.

                हेल्पलाइन                 

       शासकीय यंत्रणेशिवाय बऱ्याच खाजगी संस्थाही या क्षेत्रात कार्य करीत आहेत. अमरावतीची विद्यापीठ रोडवरील जिजाऊ नगरातील मिशन आय ए एस अंतर्गत काम करणारी डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस एकेडमी ही अशीच एक सेवाभावी संस्था आहे .याठिकाणी सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत या अकॅडमीला 373 आय ए एस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या अकादमीचा हेल्पलाइन क्रमांक 98 90 96 70 03 हा असून अकादमी चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे हे स्वतः या हेल्पलाइनवर 24 तास उपलब्ध असतात.                  

        विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा                         

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मुलींसाठी 30 टक्के आरक्षण आहे . खरं तर विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. प्रशासनात आज महिलांची गरज आहे .एका सर्वेक्षणानुसार फक्त एक पॉईंट 51 टक्के महिला प्रशासनात आहेत .प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जागा महिलांची वाट पाहत आहेत. म्हणून मुलांनी प्रशासकीय सेवेकडे वळणे गरजेचे आहे. मागासवर्गीय विद्यार्थी प्रशासनात                मागासवर्गीय विद्यार्थी साठी आरक्षण आहे व याशिवाय त्यांना प्रशासनात जाण्यासाठी शासनाने विविध खात्यामार्फत प्रशिक्षणाची व विद्या वेतनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी युवक व युवतींसाठी आदिवासी विभागाने विविध योजनांची व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घेऊन युवकांनी प्रशासनात गेले पाहिजे..

           प्रशासन म्हणजे देशसेवा

       केंद्र शासनात किंवा महाराष्ट्र शासनात तुम्हाला रोजगार मिळाला तर त्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे करता येतात .शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचविता येतात. याशिवाय नोकरीमध्ये  कायम स्वरुपी पगाराची सोय असते. फार तर बदली होईल. पण तडकाफडकी काढून टाकल्या जात नाही .आपण स्वच्छेने आनंदाने व समाधानाने शासनात काम केले तर विविध पुरस्कार देऊन तुम्हाला गौरविण्यातही  येते.               

   मित्रांनो. चला उठा .दहावी बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करू या .या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण आली तर अमरावतीची डॉ पंजाबराव देशमुख आय ए एस अकॅडमी तुम्हाला विनामूल्य मार्गदर्शन करावयास तयार आहे.               

                  

                • प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक. डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी. जिजाऊ नगर विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प.

             संवाद : 9890967003





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...