मुख्य सामग्रीवर वगळा

 


•  पाऊस : खिडकीतून पाहतांना.. 
कोसळणारे ढग अन् डोळ्यातून_वाहणारे_पाणी!

          मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा. 
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी..
इवलंसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

पाऊस, खिडकीतून पाहतांनाची ही छानसी कविता..
पण हाच पाऊस खिडकीतून पाहतांना, 
कोसळणारे ढग अन् डोळ्यात पाणी वाहत असेल तर??

माणूस कितीही श्रीमंत असो, वा गरीब..
प्रत्येकासाठी त्याची मुलगी राजकुमारीच असते.
अन् याच मुलीचा विवाह प्रत्येक बापासाठी आयुष्यातला सर्वात मोठा क्षण अन् सण सुध्दा असतो. 
हा विवाह कुठल्याही अडथळ्याविना पार पडावा,
हेच त्याचं स्वप्न असतं. 
जिवाच्या डोळ्यांना लागल्यात धारा,
मुली तुझ्या सुखासाठी खटाटोप सारा!
याप्रमाणेच हा सारा खटाटोप लेकीच्या सुखासाठी.
चार तासांवर विवाह सोहळा येऊन ठेपलाय, मांडव सजलाय अतिशय भव्य दिव्यपणे. हजारो वर्‍हाडासाठी जेवणंही बनलंय. दोन तासातच नवरदेवाची वरात निघणार, अन् नवरी म्हणून लेक बोहल्यावर चढणार.. हे स्वप्न वडीलांच्या डोळ्यात असतांना, त्याच डोळ्यांनी अचानक भरुन आलेल्या ढगातून, सोसाट्याच्या वार्‍यातून, गडगडणार्‍या आभाळातून अन् कडकडणार्‍या विजातून सुरु झालेला पाऊस पहावा.. अन् तो पाऊस पाहतांना त्या लेकीच्या बापाच्या डोळ्यातून आसवाचं पाणी वहावं, किती वेदनादायी असावा हा प्रकार? 

असंच झालं, शुक्रवार १६ मे च्या दुपारी. माजी आमदार तथा भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची लेक डॉ.शिवानी हिचा विवाह डॉ.निलेश यांच्याशी बुलढाणा अर्बन रेसीडेन्सीच्या विशाल मैदानात पार पडणार असतांना, विवाहाच्या या लोकसोहळ्याला अवघे ४ तास बाकी असतांना दुपारी अडीच वाजता अचानक आभाळ दाटून आले, अन् सोसाट्याच्या वार्‍यासह तुफानी पावसाच्या धारा सुरु झाल्या. यावेळी विजयराज शिंदे हे रेसीडेन्सीच्या वरच्या खिडकीतून तो पाऊस पाहत होते.. मात्र काहीच करु शकत नव्हते. तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण बनल्याने, अन् दोन दिवस आधी सकाळीच पाऊस पडल्याने लेक शिवानीच्या डोळ्यात त्यांनी पाणी पाहिले, अन् या बापाने अवघ्या दीड दिवसात वॉटरप्रुफ मंडपची व्यवस्थाही केली. परंतु मुख्य स्टेज अन् समोरचा परिसर मोकळाच होता. त्यात ग्राऊंड काळ्या मातीचे, अर्थात थोड्याच पावसात चिखल होणारे. हा पाऊस कोसळत होता, पण पाणी वाहत होते ते विजयराज शिंदे यांच्या डोळ्यातून!

एका तासानंतर पाऊस थांबला, मंडपवाल्यांनी जोरात तयारी सुरु केली. पुन्हा लगीनघाई सुरु झाली. सायंकाळी ‘झाले मोकळे आकाश’ अशी परिस्थिती बनली, अन् लग्न अतिशय व्यवस्थीत पार पडले. लग्नात तत्पुर्वीच मुख्यमंत्री येऊन गेले होते. सायंकाळी अनेक मंत्री, आमदार, खासदार व नेते तथा सामान्यांची तुडूंब गर्दी जमली. पावसामुळे विंटेज कारने एन्ट्री असे काही इव्हेंट करता आले नसलेतरी, हा सोहळा मात्र नंतर ‘शाही’ पध्दतीने नाहीतर ‘लोकशाही’ पध्दतीने पार पडला. आभार मानतांना विजयराज भाऊक झाले होते. सायंकाळी थांबलेला पाऊस, ही आई भवानीची कृपा असल्याचे ते म्हणाले.. 

लेकीच्या लग्नात कितीही मोठा असला तरी, दिसला तो लहान झालेला बाप. पाऊस कोसळत असतांना, डोळ्यात अश्रूंचे पाणी दाटून आलेला बाप.. अन् असहाय्यपणे पाऊस खिडकीतून बघणारा बाप. किती हा भाव-भावनांचा संमिश्र, ओलावा!!  :  राजेंद्र काळे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...