मुख्य सामग्रीवर वगळा

छत्रपती संभाजी राजांचा जयघोष, छावा संघटनेची विशाल मिरवणूक 

 विविध देखावे, हजारो युवकांचा मिरवणुकीत सहभाग

      अकोला : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त आज  छावा संघटनेतर्फे अकोला नगरीतून विशाल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील संभाजी राजांच्या जयघोषाने अकोला नगरी दुमदुमून गेली होती. प्रारंभी शिवाजी पार्क येथे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, अ. भा. छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव मराठे, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, प्रदीप खाडे,, दीपक मोरे, डॉ, श्रीराम लाहोळे, डॉ. संजय सरोदे, यांचे हस्ते पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

                  सायंकाळी 7 वाजता शिवाजी पार्क येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पावसाचे जोरदार आगमन झाले तरी मिरवणुकीतील उपस्थितीवर काहीही फरक पडला नाही. मिरवणुकीत हजारो युवकांसह महिलांचीहीं उपस्थिती लक्षणीय होती. ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक अकोट स्टॅन्ड चौक, टिळक रोड, सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, खुलेनाट्यगृह या मार्गाने फिरून स्वराज्य भावना जवळ मिरवणुकीचा समारोप झाला मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. विविध समाजसेवी संस्थांनी पाणी व फराळाची व्यवस्था केली होती.



                  यावर्षी मिरवणुकीत विविध देखाव्यांची रेलचेल होती. त्यात पातूरचा नामांकित वाघ, अकोटच्या जंगलातील अस्वलाची प्रात्यक्षिके, महिलांचे वारकरी मंडळ, लेझीम नृत्य, लाठ्या काठ्यांची प्रात्यक्षिके, मेळघाट मधील महिलांचे आदिवासी नृत्य, पोटात तलवार खुपसून घेतलेला भिल्ल, महाबली हनुमान, महाकाली, पिंपरी, आळंदा, देगाव, मानकी, तेल्हारा, सामदा दर्यापूर येथील आखाड्यांची प्रात्यक्षिके, अश्वारूढ झालेली विविध ऐतिहासिक पात्र यासह इतरही काही दृश्यांचा समावेशहोता. रथात विराजमान झालेले संभाजी महाराज मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. छत्रपती शिवाजी महाराजही आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.

  

        मिरवणुकीत रितेश मिर्झापुरे, ओम प्रकाश सावल, श्रावण लांडे, आशिष कापसे, शैलेश खरोटे, संतोष गोरे, योगेश गोतमारे  विठ्ठलराव सरप, अरविंद कपले, मनीराम ताले, ऍड. देवाशीश काकड, पवन महल्ले, बालू बगाडे, पंकज जायले, सुरेश खुमकर गुरुजी, निवृत्ती वानखडे, अनिरुद्ध भाजीपाले, बबलू वसु, संतोष भिसे, बाळासाहेब लाहोळे, अशोक वाकोडे, गजानन फाटे, श्याम कुलट, प्रवीण बाणेरकर, महेंद्र काळे, परीक्षित बोचे, अमोल हिंगणे, शाम कोल्हे, मनोहर मांगटे पाटील, निखिल श्रीनगर, दिनकर पाटील, आशु वानखडे, डॉ. नरेंद्र सरोदे, डॉ. राम शिंदे, सुरेश गाढेपाटील, रवी साखरे, चेतन लोखंडे, अक्षय खाडे, गोपाल पाटकर, देवेंद्र मोहोकार, कैलास बागडे, सोनू गिरी, गोपाळराव गालट, गणेश पोलाखडे, गणेश पारस्कर, संदीप कुलट, भारत भडांगे, दीपक बिहाडे, गणेश इंगळे, विवेक इंगळे, विजय कुलट, रवी मालगन, अक्षय गोंडचवर, पंजाब भागवत, नितीन चिखलकर, संतोष बिहाडे, दीपक लोखंडे यांचे सह इतरही गणमान्य नागरिक सहभागी झाले होते.

                    ooooooo

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...