मुख्य सामग्रीवर वगळा

अमरावतीचे सुपूत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई 

      • लेखक : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

           संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प, 

                     संवाद :  9890967003

    मरावतीचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी आज 14 मे 2025 या तारखेला भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन पदभार ग्रहण केला आहे. त्यामुळे आज संपूर्ण अमरावती शहरात जिल्ह्यात आणि विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अमरावतीला हा बहुमान लाभलेला आहे. यापूर्वी अमरावतीच्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हा देखील अमरावती बरोबरच पूर्ण महाराष्ट्र खुलून आला होता. न्यायमूर्ती भूषण गवई यांना घडविण्यामध्ये त्यांचे पिताश्री माजी राज्यपाल श्री रा सू.गवई तसेच मातोश्री प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांच्या मोलाचा वाटा आहे. वडिलांपेक्षा भूषण सरांना घडविण्यामध्ये मातोश्री कमलताईंचा वाटा हा जास्त आहे. सन्माननीय दादासाहेब गवई हे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देऊन त्यांनी स्वतःला घडविले. आमदार झाले. विधानसभा अध्यक्ष झाले आणि नंतर बिहार केरळ त्रिपुरा राज्याचे राज्यपाल झाले. दादासाहेबांच्या नेहमी फिरता दौरा. त्यामुळे भूषण सरांना घडविण्यामध्ये  कमलताईंचा वाटा निश्चितच जास्त आहे आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये दादासाहेबांनंतर कमलताई  गवई दादासाहेबांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांनी स्वर्गीय दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत शिक्षणाची गंगा आमच्या अमरावती जिल्ह्यात खेडोपाडी नेली आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून 1932 या वर्षापासून खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा विदर्भात आणली. त्याला दादासाहेबांनी हातभार लावला आणि स्वतःच्या शिक्षण संस्थेमार्फत समाजातील दीन दुबळ्या दलित व सर्वसामान्य माणसासाठी आपली शैक्षणिक दालने मोकळी केली  .दादासाहेब पूर्वी फ्रेझरपुरा या भागात राहत होते. त्यांची मुले मराठी शाळेमध्ये शिकले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले. साहेबांच्या सततच्या दौऱ्यामुळे ते फिरस्तीवर असायचे त्यामुळे भूषण सरांना घडविण्याचे काम कमल ताईंनी केले आणि आजही त्या इतर समाजातील मुलांना घडविण्याचे काम करीत आहेत. मी त्यांच्या नेहमी सोबत असतो. त्यांच्या बारीक सारीक गोष्टी मी टिपत असतो आणि त्यावरून अतिशय संवेदनशील मनाच्या कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर म्हणूनच कमलताई गवई यांचा उल्लेख करावा लागेल इगतपुरीचे श्री गोयनका गुरुजींचे विपश्यना केंद्र संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भारतातच नव्हे जगात या केंद्राची कीर्ती पसरलेली आहे. त्याच धर्तीवर पण लहानशा प्रमाणात श्रीमती कमलताई गवई यांनी अमरावतीच्या छत्रीतलावच्या जंगलानंतर येणाऱ्या मोगरा या गावला विपश्यना केंद्र प्रारंभ केले आहे. या विपश्यना केंद्रातून हजारो साधक आजपर्यंत तयार झालेले आहेत. कमल आईसाहेबांचे हे काम मी सर्वात मोठे मानतो .कारण विपश्यनेमुळे अंतर्गत मनामध्ये जी क्रांती होते ती खरोखरच आत्मशुद्धीसाठी आत्मोन्नतीसाठी खूपच फायदेशीर असते. या विपश्यना केंद्रासाठी आईसाहेबांनी स्वतःला झोकून दिले आहे .त्यांच्याकडे दर महिन्याला दहा दिवसांचे एक विपश्यना शिबिर असते. या विपश्यना शिबिरासाठी येणाऱ्या मार्गदर्शनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांची व्यवस्था सन्माननीय ताईसाहेब स्वतः पाहतात. इतकेच काय त्या ट्रेनरला घ्यायला व सोडायला रेल्वे स्टेशनवर जातात. त्यांचे म्हणणे असे आहे की त्यांनी शिबिरासाठी दहा दिवस येऊन आपली सेवा दिली आहे आणि म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ताईसाहेब सतत लोकांच्या संपर्कात असतात. मेडिटेशनमुळे त्यांची झोप लवकर होते .लोकांना भेटणे .त्यांच्या समस्या समजावून घेणे. त्यावर तोडगा काढणे हे कार्य ताई साहेबांचे अविरत सुरू होते आहे आणि राहिलही.मी फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत असल्यामुळे व माझी बहीण प्रा.निर्मला काठोळे ही अमरावतीच्या कॅम्प भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठीची प्राध्यापिका असल्यामुळे गवई परिवाराचा माझा जवळचा संबंध आला. माझ्या बहिणीला कमलताई साहेबांनी नोकरीला लावले. ती अगोदर आसेगाव पूर्णा येथे नोकरीला होती.  तिची ती नोकरी गेली. मी कमलताईजवळ शब्द टाकला. कमलताईंनी अर्ज करण्यास सांगितला . मुलाखतीला बोलावले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी महाविद्यालयात मराठी विषयासाठी तिची निवड केली. विपश्यने बरोबरच कमलताईंनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन. त्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम आपल्या अमरावतीच्या काँग्रेसनगर मधील घरासमोर जे डिव्हायडर आहे त्या पूर्ण डिव्हायडरवर झाडे लावली. रोज किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि तो सातत्याने पूर्ण होत आहे. विपश्यने बरोबर याही कामाला त्यांनी वाहून घेतले आहे. त्यासाठी पत्रके प्रकाशित करणे व ती सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी वितरित करणे हे मोलाचे काम त्या करीत आहेत. 

आमचे मिशन आय.ए.एस. ही चळवळ त्यांना आवडली आणि म्हणून त्यांनी या चळवळीमध्ये आमच्याबरोबर सहभाग दर्शविला. मिशनच्या अनेक स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये त्या सहभागी होतात. न्यायमूर्ती भूषण गवईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली त्याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांना सांगतात. आणि लोक देखील उत्साहाने त्यांचे व्याख्यान ऐकतात. आम्ही सर्व साधारणपणे दररोज पाच स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतो. कमलताई म्हणतात अजून एक दोन घ्या .कारण माझ्या जीवनाचा उत्तरार्ध आहे आणि या जीवनातला प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट मला उपयोगात आणायचा आहे. पाच कार्यक्रम करून देखील त्याच थकत नाहीत आणि याचे रहस्य त्यांनी केलेल्या विपशनेमध्ये आहे. त्या विपशनेच्या वरिष्ठ आचार्य आहेत.  ताईंना मागे दिल्ली येथे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले .या सर्व ठिकाणी त्यांनी विपश्यना वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन व मिशन आय ए एस यावर भर दिला. आज 14 तारखेला न्यायमूर्ती भूषण गवई सर सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. त्यानिमित्त कमलताई साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. 

              0000000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...