वीज झाडांवर आणि माणसांवरच का पडते?
अकोला : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. विजेच्या कडकडाटासह अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. खरं तर जेव्हा जेव्हा तुफान, जोरदार, मुसळधार पाऊस सुरू होतो तेव्हा तेव्हा एक भीती आपल्या मनात कायम असते, ती म्हणजे वीज कोसळण्याची… कारण अनेकदा वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. आकाशातून कोसळणारी वीज दरवर्षी अनेक लोकांचा जीव घेते… परंतु आकाशात विजेची निर्मिती कशी होते? आणि वीज हि झाडांवरच किंवा माणसांवरच का कोसळते? हे तुम्हाला माहितेय का? चला तर आम्ही तुम्हाला सांगतो.
आकाशात विजेची निर्मिति कशी होते?
वीज ही ढगांमध्ये तयार होणारी स्थिर विद्युत ऊर्जा आहे, जी ढग आणि जमीन यांच्यातील संभाव्य फरकामुळे बाहेर पडते. ढगांच्या खालच्या भागात नकारात्मक भार आणि जमिनीवर किंवा ढगांच्या वरच्या भागात सकारात्मक भार जमा होतो. जेव्हा ढगांमधील नकारात्मक (negative) आणि जमिनीवरील सकारात्मक (positive) भार यांच्यात मोठा फरक निर्माण होतो, तेव्हा वीज ही कमी प्रतिकाराच्या मार्गाने म्हणजेच झाडे, माणसे यांच्या दिशेने जमिनीकडे प्रवास करते.वीज जेव्हा जेव्हा चमकत असते, तेव्हा आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सांगत असते कि झाडाखाली उभा राहू नका… कारण वीज झाडावर कोसळण्याची शक्यता जास्त असते. परंतु, वीज झाडांवर का कोसळते यामागील कारण तुम्हाला माहितेय का? तर वीज नेहमी झाडांवर किंवा माणसांवर पडते याचे कारण विजेची नैसर्गिक प्रक्रिया आणि तिचे भौतिक गुणधर्म आहेत. झाडे सामान्यतः उंच असतात, त्यामुळे ते विजेसाठी जमिनीच्या जवळचे बनतात. वीज नेहमी जवळच्या आणि उंच ठिकाणी पडते, कारण ती कमी अंतर आणि कमी प्रतिकाराचा मार्ग शोधते. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे झाडांमध्ये पाणी आणि सॅप (रस) असते, जे विजेचे चांगले वाहक आहे. यामुळे झाडे विजेचा प्रवाह सहजपणे वाहून नेऊ शकतात. Lightning Strikeआता तुम्ही म्हणाल वीज माणसांवर का पडते? Lightning Strike तर त्यामागे सुद्धा कारणे आहेत. जर एखादी व्यक्ती मोकळ्या मैदानात, पाण्याजवळ किंवा उंच ठिकाणी असेल, तर ती विजेसाठी जवळचा बिंदू बनू शकते. विशेषतः माणूस जर पाण्यात किंवा ओल्या जागी उभा असेल, तर विजेचा प्रवाह त्याच्याकडे आकर्षित होतो. आकाशातून कोसळणारी वीज दरवर्षी कित्येक बळी घेते. आपल्या भारतात दरवर्षी दोन ते अडीच हजार लोकांचा वीज पडून मृत्यू होतो. या मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.
वीज चमकत असेल तर अशी घ्या काळजी
शेतातल्या कामांसाठी स्वतः जाऊ नका
एखाद्या बंदिस्त इमारतीमध्ये आसरा घ्या
वीज चमकत असेल तर झाडाखाली उभे राहू नका. वीज चमकत असताना तुम्ही प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा. सायकल, स्कूटर वरून प्रवास करू नका. वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा