मुख्य सामग्रीवर वगळा


श्री बाराभाई गणपती वेबसाईटमध्ये नवीन सुधारणा 
    - राहूल इंगळे यांची माहिती

------------------------------------------------
                  
(विजय केंदरकर)
अकोला : 
बाप्पाच्या कृपेने आणि आपणा सर्व भक्तांच्या सहकार्याने, श्री बाराभाई गणपती उत्सव अकोला यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये व सुधारणा करण्यात आल्या आहेत. आपण आपल्या मोबाईलवर, संगणकावर किंवा टॅबवरून खालील लिंकवर जाऊन नवीन अद्यतने अनुभवू शकता
 https://barabhaiganpatiakola.in. अशी माहिती श्री बाराभाई गणपती उत्सव मंडळाचे तथा वेबसाईटचे युवा निर्माते श्री राहूल इंगळे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीसोबत बोलतांना दिली.
         सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढ्याच श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासला आहे. या मंडळ व घराण्यांच्या उत्सवाने आता शतके ओलांडली आहेत. मात्र, त्यांच्याकडील गणेशाची मूर्ती, त्यामागच्या कलाकारांचे हात आजही ती परंपरा जतन करून आहेत. 
      अकोल्यातील जुने शहरातील जयहिंद चौकातील पेशवेकालीन इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या गणपतीची प्राचीन परंपरा नाथ कुटुंबीय व अकोलेकरांनी भक्तिभावाने जपली.  श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेशोत्सवाचे एक आगळे-वेगळे आकर्षण. वऱ्हाडातील सर्वात प्राचीन व पारंपरिक गणपती म्हणून श्री बाराभाई गणपतीचा नावलौकिक आहे.
      श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून झाली याची कोणतीही नोंद नाही. या गणपतीचा पेशवेकालिन बाराभाईच्या कारस्थानांशी निकट संबंध असावा.  म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्राचीन काळी श्री बाराभाई गणपतीची रुढीपरंपरेने स्थापना केल्या जात होती. मात्र, कालांतराने गणेशोत्सवातील सार्वजनिक उत्साह कमी झाला व ही परंपरा संपुष्टात येऊ नये म्हणून संस्थापक अध्यक्ष कै.भगवाननाथ इंगळे यांनी आपल्या घरी श्री बाराभाई गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून श्री बाराभाई गणपती संपूर्णत: नाथ कुटुंबाचा आहे.
      श्री बाराभाई गणपतीची परंपरा नाथ कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली. या गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होऊन आज अनेक वर्ष लोटले आहेत. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर इंग्रजकालीन परिस्थतीतही अकोल्यातून कै.भगवाननाथ इंगळे यांनी श्री बाराभाई गणपतीसह शहरातील सात-आठ मंडळांची मिरवणूक काढली होती. तेव्हापासून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत पहिल्या स्थानावर श्री बाराभाई गणपती व दुसऱ्या स्थानावर श्री राजराजेश्वाराचा गणपती पालखीत असतो. अकोल्यातील ही प्रथा १८९० च्या सुमारास सुरु झाली. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक दिंड्या असतात. श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराज सुध्दा पिढ्यांपिढ्या आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहेत. 
       अनेक वर्षांपासून असलेल्या या गणपतीचे अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत. श्री बाराभाई गणपतीला अनेक जण नवस बोलतात, साकडे घालतात. भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला श्री बाराभाई गणपतीने कधीही तडा जाऊ दिला नाही, असे मोठ्या अभिमानाने नाथ कुटुंबीय सांगतात. अकोल्यातील श्री बाराभाई गणपती एकात्मतेचे प्रतीक आहे,असेही राहूल इंगळे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.
 या वेबसाईटमध्ये आकोलेकरांकडून आणखी काही नवीन सुधारणा असतील त्याचे स्वागत असल्याचे सांगून त्यांनी  9881317069  या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.
https://barabhaiganpatiakola.in

=========================





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...