लेखिका : डॉ.सौ.योगीता एस.चव्हाण
(होमिओपॅथीक तज्ञ. संवाद : 8999060620)
कुठलाही एक दिवस आईचा नसतो, कारणं प्रत्येक दिवसच आईचा आणि आईमुळं असतो. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस खऱ्या अर्थाने घराला घरपण येत ते म्हणजे फक्त आईमुळेच त्यामुळे आईला जपायला हवं आणि त्याकरिता आईची आई व्हायला हवं. तस बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा आईचाच आहे परंतु भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आईच्या बद्दलची आत्मीयता, कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मातृत्व ही एक अशी निसर्गाच देण आहे जी अनेक भावनांचा संगम आहे, जिथे हिशोब हा केवळ प्रेमाचा होतो, अगदी गर्भधारणेपासन, प्रसूतीपर्यंत, त्यानंतर बाल संगोपन, तारुण्यवस्थेपर्यंत थोडक्यात काय तर पुरुष एकदा जन्माला येतो परंतु माता ही अनेकदा जन्माला येते, ती आयुष्यात अनेकदा नवनवीन अडचणींना सामोरे जाते आणि त्यावर मात कारून आपल्या बाळाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा फुलवता येईल याकरता ती आपलं आयुष्य पणाला लावते. खऱ्या अर्थाने आत्मा आणि ईश्वर या दोन शब्दांची सांगड म्हणजे आई आणि आई होणं जगातला तो खरा आणि निखळ आनंद आहे ज्यात फक्त त्याग आणि अनेक वेदना आहेत परंतु कुठलीही उपकाराची किंवा परोपकाराची भावना देखील मनाला स्पर्श करत नाही. खरंच जर आपल्याला ईश्वराची सेवा करायची असेल तर आईची करा कारणं आईच्या चरणातच खरा स्वर्ग आहे. म्हणतात ना “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ” मातृत्व कस आसवं याचं उत्तम उदाहरण म्हणजे माँ जिजाऊ आणि त्या मातृत्वाच्या त्यागातून उमललेलं एक सुंदर फुल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी आपल्या मातृत्वाचे खऱ्या अर्थाने पांग फेडले. आज भारत पाकिस्तान सीमारेषेवर सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत बलिदान होणारा सैनिक नाईक असो वा वनंजे यांनी आपल्या मातेच्या दुधाचे निश्चितच ऋण फेडलेत.
आज घडीला प्रत्येक मातेने आपल्या मुलांना कस घडवायला हवं म्हणजे आजचा आतंकवाद असो की समाजात वाढलेला व्याभिचार असो याला थाराच मिळायला नको कारणं आतंकवादी आणि त्याला कंठस्नान घालणारा सैनिक दोघेही कुठल्या ना कुठल्या मातृत्वाला संपवतायत, चला तर मग आपल्या मातेच्या मातृत्वाला योग्य न्याय देऊन एक सुजलाम सुफलाम निर्मिती करिताचा प्रण करूया या मातृत्व दिनी !
(लेखिका ह्या होमिओपॕथिक तज्ञ आहेत)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा