मुख्य सामग्रीवर वगळा


भगरीचे आरोग्यदायी फायदे

        गर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.  सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.  पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
      आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.  खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.
हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.


       शिजलेल्या भगरीची चवसुद्धा काहीशी भातासारखीच असते.  भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.
भगर हे अख्या भारतभर उपासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.
      जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रवे आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग : 

1. जास्त प्रमाणात प्रोटीन

भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते.
तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात.  जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.  कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.

2. फायबर रिच फूड

भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.  आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.  म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.
       भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.
       आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते.
या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.

3. लो ग्लायसेमिक इंडेक्स

      भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.
        यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.  ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
       अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.

4. ग्लूटेन फ्री

भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.  आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.
       ग्लूटेनमध्ये काही पोषक दर्वे नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.
ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.
अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.

5. जास्त प्रमाणात आयर्न असते

भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते.
म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.
      इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.
साधारण 100 ग्राम भगरीतून 18.5 mg आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.

6. व्हिटॅमिन्स व खनिज प्रमाण जास्त 

भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.  तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

7. सोडियम फ्री फूड

भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.

8. भरपूर अँटिऑक्सिडंट्स

साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.  अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.
      मोठी माणसे भगर जरी उपसाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.  कारण ती पचायला अतिशय हलकी असते.
     भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.  शिवाय नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करताना, आपल्या शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करावा.
(माहिती आवडली तर इतर ग्रुपवर शेअर करा) 
                            -  सुनील इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...