मुख्य सामग्रीवर वगळा

 

           आरोग्यदायी बीट

             लेखक :
              •  अजय जाधव कसबेकर

     बीट म्हटलं की आपल्याला रक्त आठवतं. बीट खाल्याने रक्त वाढतं, असा लहानपणी समज होता. तो पूर्णपणे चुकीचा नाही. बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे. जसे की उच्च रक्तदाब कमी, मधुमेह, स्मरणशक्ती, इत्यादी. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आधी बीटमध्ये असलेल्या पोषक घटकांबद्दल जाणून घेऊया.


      बीटचा रंग लाल असतो.  कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो.  १०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि  ४३,००० कॅलरीज असतात.
  

    
         आरोग्यासाठी फायदे

१. रक्तदाब कमी होतो
बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक अॅसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक अॅसिडमुळे रक्तवाहिन्य प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम.

२. हृदयासाठी गुणकारी
बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचं असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका रोखण्याचं काम नायट्रेट करतं. बीटमध्ये असलेले फायबर्स कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइडला नियंत्रित करण्याचं काम करतात.



३. वजन कमी करण्यासाठी उत्तम
फायबर्स आणि भरपूर प्रमाणातील पाणी यामुळे बीट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम समजलं जातं. फायबर्स तुमची भूक कमी करण्याचं काम करतात. फायबर असलेलं अन्न घेतल्याने पोट भरलं असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते आणि परिणामी वजन कमी होतं.

४. मेंदू तल्लख होतो
नायट्रेटमुळे मानसिक आरोग्य आणि आकलनशक्ती मजबूत होते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नायट्रेटमुळे रक्तवाहिन्या प्रसारण पावतात. रक्तवाहिन्या प्रसारण पावल्यामुळे मेंदूपर्यंत जास्तीतजास्त रक्त पोहोचतं. रक्तपुरवठा सुरळीत झाल्याने मेंदू जोशाने काम करू लागतो.
 
५. त्वचा तजेलदार दिसू लागते.
बीटरुट्समध्ये विटॅमीन आणि खनिज मोठ्याप्रमाणात असतात. विटॅमीन आणि खनिजांमुळे त्वचा तजेलदार दिसते. तसेच शरीरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलेजन प्रथिनांची वाढ होते.

६. डोळ्यांसाठी गुणकारी
बीटमध्ये असलेल्या विटॅमीन A च्या मुबलकतेमुळे मोतीबिंदू होण्याचा धोका टळतो. तसेच वयोमानामुळे येणाऱ्या अंधत्वावर प्रतिबंध लागतो.

७. पचनशक्ती वाढते.
बीटमध्ये असलेले फायबर्स पचनशक्ती सुरळीत ठेवण्याचं काम करतात. पोटात दुखणे, बद्धकोष्ठ सारखे त्रास होत नाहीत.

८. अशक्तपणा कमी होतो.
बीटमध्ये असलेलं लोहाचं प्रमाण अशक्तपणावर (रक्तक्षय) मात करतं. लोह या खानिजामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून अशक्तपणा कमी होतो. बीटमध्ये असलेल्या विटॅमीन C मुळे लोह जास्तीतजास्त शोषून घेण्यास मदत होते.

९. जळजळ कमी होते
बीटला लाल रंग देणाऱ्या बेटालिन रंगद्रव्यात औषधी गुणधर्म सुद्धा असतात. जळजळ होणे आणि सूज येणे या समस्या बेटालिनमुळे कमी होतात.

१०. कॅन्सरचा धोका कमी होतो.
बीटमध्ये असलेल्या बायोअक्टीव्ह कंपाउंडमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत. बीटच्या या फायद्यावर अजूनही पूर्ण संशोधन व्हायचं आहे.
              •  अजय जाधव कसबेकर, 
                 कोल्हापूर.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सूर्यप्रकाशातून व्हिटामीन-डी 
 मिळण्याची योग्य वेळ

       व्हिटामीन डी आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे. हे व्हिटामीन आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यास मदत करते. जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. या व्यतिरिक्त व्हिटामीन डी इम्यून सिस्टिम चांगली ठेवता येते.
       ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. हृदय आणि ब्लड वेसल्सही चांगल्या राहतात. मानसिक आरोग्य चांगले राहते. व्हिटामीन डी मुळे डिप्रेशन, एन्झायटीआणि अन्य  मानसिक आजार बरे होतात.
       व्यवस्थित ऊन असते पण बऱ्याच लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता असते. या मागे अनेक कारणं असू शकतात. लाईफस्टाईलमधील बदल, सुर्याच्या किरणांमध्ये न जाणं यामुळे व्हिटामीन डी व्यवस्थित मिळत नाही. एक्सपर्ट्स सांगतात की सकाळी १० ते १२ वाजताची वेळ ही सगळ्यात उत्तम आहे.
       यावेळी सुर्याची अल्ट्राव्हायलेट बी किरणं त्वचेवर सरळ पडतात. ज्यातून व्हिटामीन डी मिळते. कारण  जास्त उन्हात राहिल्यामुळे त्वचा जळू शकते आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ऊन्हात राहताना सावधगिरी बाळगायला हवी. नियमित स्वरूपात उन्हात १५ ते २० मिनिटांचा वेळ घालवायला हवा. ज्यामुळे व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करता येते.
      सकाळी ७ वाजता ऊन्हात व्हिटामीन डी व्यवस्थित मिळते. तज्ज्ञांच्या मते हे पूर्ण बरोबर नाही, कारण ७ वाजता सुर्याची किरणे धरतीवर खूपच कमी येतात. सुर्याची किरणं पृथ्वीपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीत ज्यामुळे उन्हाचा प्रभाव कमी होतो. इतकंच नाही, तर सूर्यातून निघणारे अल्ट्राव्हायलेट रेज आंशिक स्वरूपात फिल्टर होतात.
(माहिती आवडली तर इतरांना शेअर करा.)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...