मुख्य सामग्रीवर वगळा


१०० वर्षाच्या तपस्वी आजीची उत्तम देखभाल -परिवाराची कृतज्ञता

जागतिक कुटूंब दिनानिमित्त

     

              लेखक : 

              ज्ञानेश्वर रामभाऊ मांडेकर

    सेवानिवृत्त जि. प. शिक्षक, अकोला.


       दिवसेंदिवस घरातील वृध्द - आईवडीलांची सेवा दुरापास्त होत असुन त्यांच्या म्हातरपणाच्या त्रासापाून दूर कसे राहता येईल, ही पद्धत दिसून येत  असताना,  जुने शहरातील मांडेकर परिवारात पाच बंधूचा परिवार एकञित नांदत असून आईची १०० व्या वर्षानंतरही सेवा घडत असल्याने धन्यता मानत आनंद व्यक्त करीत  आहे .

          परिवारातील कर्तेपुरुष महादेव मांडेकर आज ८०वर्षाचे आहेत. तर त्यांची आई श्रीमती रमाबाई रामभाऊ मांडेकर यांनी शंभरी पार केली आहे.  परिवारात पाच भाऊ महादेव, पुरुषोत्तम, गोपाल, रामदास, ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नी सौ. लताबाई, सौ.नंदाबाई ,सौ. सीमाताई , सौ. शिलाताई, सौ. वर्षाताई यांच्या वैचारिक देवाण-घेवाण व त्यागमय कार्यपद्धतीत चुकीच्या बाबीकडे नजर अंदाज धोरणाने  परिवार आजपण संयुक्त कुटुंब पद्धतीने नांदत आहे.  

     सुखदुःखाच्या जीवनक्रमाच्या  टप्प्यात प्राधान्य देत  सामाजिक - सांसारीक जबाबदारीने परिवारातील सदस्य कार्यरत आहेत.

    माडेकर बंधूंचे पिताश्री स्व. रामभाऊ मांडेकर  यांनी केलेल्या उत्तम संस्काराची, धार्मिक आचरणाची जाणीव आजही मांडेकर परिवारात जाणवते.



     अनेक सदस्य  सामाजिक - धार्मिक व कौटुंबिक कार्यात अग्रेसर आहेत. परिवारात बुद्धीची देवता गणपतीचा दहा दिवसांचा उत्सव स्वंयभू गणरायाला  पारंपारिक पद्धतीने व उत्साहात सोहळा  केला जातो. तर निर्जला एकादशीच्या दिनी २४ तास धार्मिक वेद-पठणासह अभिषेक केला जातो. ऋषभ राजाचा सण पोळा परिवारात मोठ्या उत्साहात आजही जुन्या रुढी परंपरेला धरुन साजरा केला जातो.

 वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्याला प्रोत्साहन, २१ मे रोजी वडीलांची पुण्यतिथी, नव सदस्यांना प्रोत्साहन म्हणून  दरवर्षी कार्यक्रम नियमित स्वरूपात आयोजित केल्या जाते . या धावपळीच्या काळात रमाबाई नी शंभरी कशी  पार केली,  हे परिवाराला जाणवले नाही.   म्हणून त्यांचा शतकाचा सुवर्णक्षणाचा सोहळा  आईच्या माहेरवासी यांच्या  उपस्थितीत मंगल वाद्य ,  वेदपठनासह  शेतीवर नैसर्गिकवा तावरणात घेवून कृतज्ञता अलिकडेच व्यक्त केली.

        संयुक्त परिवारात जीवनाकार्यात अनेक क्षेत्राचा अभ्यास हा शिक्षण क्षेत्रातील  ज्ञानेश्वर मांडेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक वर्षाच्या  अभ्यासाने केलेला असल्याने विचारा सह आचरण करीत  जीवनातील चढउतारांना सकारात्मक विचार सरणीने मात करीत जीवन क्रमातील अनेक कार्याला पूर्णत्वास नेले आहे . तसेच आपल्या शिक्षकी पेशेतील प्रदीर्घ अनुभव परिवाराच्या उन्नती करण्याकरीता  जबाबदारीने पुर्णपणे करीत  आहे.

    परिवारात मुख्यत:  व्यापार हा व्यवसाय मुळापासून असल्याने नवपिढी  परिवाराच्या नियंत्रणात पुढे नेत आहे. परिवारात आज प्रत्यक्ष  २३ सदस्य असुन सात मुलींचा मोठा गोतावळा हा नियामित परिवाराचा भागच आहे. तसेच नियमित वैचारीक देवाण- घेवाण करीता मोठा मिञपरिवार -हितचिंतक याचा सहवास लाभलेला असल्याने वैचारीक संपर्कात जीवनातील सत्यता- सदस्य अनुभवतात.

          संयुक्त परिवारात लोकशाही विचारसरणी नुसार कार्यास मांडेकर परिवाराने प्राधान्य दिले असल्याने सदस्यात कार्य करण्यास पुर्णत: स्वातंत्र्य आहे. योग्य - अयोग्य बाबीची चर्चा करण्यात येवून स्वातंञ्य पुर्ण कार्यपध्दत आहे . परिवारातील सदस्य शैक्षणिक - सामाजिक - व्यावसायिक-धार्मिक  दृष्ट्या  अग्रेसर असल्याचे दिसून येते .

         रामायणामधून त्यागमय जीवन व महाभारता मधील  जीवन काळात कर्तव्यास प्राधान्य यांचा वैचारीक मेळ ठेवण्यात येवून  सकारात्मक धोरणानुसार कार्य करण्यात येते.  सदस्याच्या नकारात्मक मुळे उद्‌भवण्याच्या विषयाला तिलांजली देण्यात येते . घरी दररोज व तुकडोजी महाराजची प्रार्थना सामुदायिक रित्या गायन करून जीवनाची सत्यताचा परिचय अनुभव केला जातो .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...