खा.अनूप धोत्रे व आ.हरिश पिंपळे यांच्या उपस्थितीत
अमृत स्टेशन्सअंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण
अकोला :
रेल्वे प्रवाशांना चांगला सुविधा उपलब्ध होऊन रेल्वे स्थानक पासून तर रेल्वे प्लॅटफॉर्म रेल्वे गाड्या यांचे साफसफाई पासून तर सर्व सुविधायुक्त स्टेशन निर्माण करण्याचा जागतिक विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून त्यांच्या नेतृत्वात 103 रेल्वे स्थानकाचे नवीनीकरण करण्याचे काम हा ऐतिहासिक कार्य असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवी यांच्या नेतृत्वात देशभरातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा कात टाकत आहेत. नव्या भारताची निर्मिती सुरू असताना आणि विकसित भारत २०४७ हा संकल्प पूर्णत्वाला नेत असताना भारतीय रेल्वेचे रूप पूर्णपणे बदलले जात आहे. यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अमृत स्टेशन्स योजना असून अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचं यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे स्थानक मुर्तीजापुर याचा विकास करण्याची मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्याकडे केली होती.
त्याला पूर्णत्व करण्याचं काम खासदार अनुप धोत्रे यांनी केले आहे.अमृत स्टेशन्स योजनेच्या अंतर्गत देशातील १०३ आणि त्यातील महाराष्ट्रातील १५ रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. या स्टेशनचे लोकार्पण गुरुवार, २२ मे रोजी झाले, असून मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचे लोकार्पण खासदार अनुप धोत्रे हस्ते झाले आहे, सोबत आमदार हरीश पिंपळे,जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी,नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.
या रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे तीन जिल्ह्याला लाभ मिळणार असून केंद्र आणि राज्य शासन सातत्याने विकास परवाला गती देत असल्याचे प्रतिपादन आमदार हरीश पिंपळे यांनी करून खासदार अणू धोत्रे व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
या रेल्वे स्थानकाच्या प्रवासाने लाभ घ्यावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली तसेच रेल्वे गाड्यांच्या थांबा संदर्भात खासदार अनुप धोत्रे आगरी भूमिका असून यासंबंधी पाठपुरावा करत असून यामध्ये यश मिळेल असा आशावाद सुद्धा आमदार पिंपळे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो भारत माता की जय जय श्रीराम, जय संविधान, या जयघोषाने रेल्वे स्थानक दुमदुमले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा