ना.रक्षाताई खडसेंची विजयराज शिंदेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
बुलढाणा :
काही नियोजित कार्यक्रमाुळे विवाह सोहळ्यास उपस्थित राहू न शकल्याने
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा.ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मा.आ.तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
ताईंनी घरी आवर्जून भेट देऊन विजयराजेयांची सुकन्या डॉ.शिवानी हिची भेट घेऊन तिला वैवाहिक जिवनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयराज शिंदे साहेबाच्या,कुटूंबियांनी ताईंचा कौटुंबिक स्वागत सत्कार केला. यावेळी भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत बरदे, मा. नगरसेवक मंदार बाहेकर, सतीश पाटील, नंदू लवंगे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ स्मिताताई चेकेटकर, मा नगरसेविका सौ सिंधुताई खेडेकर,शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा भगवान गरुडे,देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्रजी काळे यांसह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा