मुख्य सामग्रीवर वगळा

श्री शैव गुरव हितकारिणी मंडळातर्फे उपनयन आणि वधूवर परिचय मेळावा उत्साहात 


•  सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती

अमरावती : श्री शैव गुरव हितकारिणी मंडळ, अमरावती यांच्या वतीने रविवारी मृगेंद्र मठ, अंबागेट येथे उपनयन संस्कार व वधुवर परिचय मेळावा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक वातावरणात पार पडला. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.




खासदार डॉ. अनिल बोंडे 

          या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "आज अशा सामूहिक उपक्रमांची समाजाला नितांत आवश्यकता आहे." गुरव समाज हा देवाधिदेव महादेवाची भक्ती करणारा धार्मिक समाज असून, प्रत्येक क्षेत्रात आपली कर्तृत्वछाप उमठवत आहे.



संत काशीबा गुरव महामंडळाचा उल्लेख:

डॉ. बोंडे यांनी सांगितले की, मागासवर्गीय गटात मोडणाऱ्या गुरव समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. हे महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे कार्य करत आहे.

५० लाख निधी जाहीर

        अकोली येथील गुरव समाज भवनाच्या वॉल कंपाउंडसाठी आपल्या खासदार निधीतून ५० लाख रुपये देण्याची घोषणाही डॉ. बोंडे यांनी यावेळी केली. त्यांच्या या जाहीर घोषणेनंतर उपस्थित गुरव समाजबांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात आभार व्यक्त केले.

सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती

    या कार्यक्रमाला विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर सौ. रिनानंदा ताई, माजी नगरसेवक लकी नंदा माजी नगरसेविका मंजूषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करत गुरव समाजाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.

४० बटुकांचे उपनयन, १०० हून अधिक मुला-मुलींची नोंदणी

   उपनयन विधीत जवळपास ४० बटुकांचा मंत्रोच्चारासह पारंपरिक पद्धतीने संस्कार करण्यात आला. तसेच वधुवर परिचय मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १०० हून अधिक मुलांनी आणि सुमारे ८० मुलींनी नोंदणी केली होती. महिला आघाडीच्या सचिव मारोटकर ताईंनी कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन केले.

       कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष शरद देवरणकर, सचिव दिलीप बेलबागकर, प्रकल्प प्रमुख मनोज तायडे, मार्गदर्शक त्रिदीप वानखडे, अशोकराव कुळकर्णी, राजेंद्र पंढरपूरकर, उपाध्यक्ष गोपाल चिखलकर व दिनकरराव अंबुलकर, कोषाध्यक्ष जयंतराव पुसतकर, श्रीकांत येते, मुकुंदराव पुसदकर, विजय पुसतकर, जयंतराव वानखडे, डॉ राजेंद्र बाळापुरे, दिपकराव पिंजरकर‌, शरदराव पुसतकर, सुशील कथलकर, योगेश कथलकर,राजेश पुसतकर,अनिल चिखलकर, राहुल खंडारे,सागर दलाल,दिलीप पैठणकर, राजेश बोराटे,निलेश वानखडे,प्रकाश कोहळे,अभीजीत देवरणकर, पंकज खंडार, कृष्णराव चिखलकर,शुभम पाटील शेगोकर, गोपाळराव वाठोडकर, श्रीकांत धानोरकर,संजय वानखडे, अनंतराव पुसतकर, श्रीकृष्ण बाळापूरे, प्रविण शेगोकर,गोविंदराव रोहणकर, राजेंद्र कथलकर, सुधीर रोहणकर, हरीभाऊ बाळापुरे, राजेंद्र कुरहेकर,कावळे गुरूजी, देविदासजी धनसकर, डॉ कथलकर,युवक आघाडीचे महेश कथलकर, राहुल खंडारे, राहुल मोरे, महिला आघाडी अध्यक्षा तृप्ती व्यवहारे, सचिव संजीवनी मारोटकर,दिपाताई बेलबागकर, अड,हितेषणी देवरणकर, संध्याताई पुसतकर,मेघा देवरणकर, सुनीता बाळापुरे,माधुरी तायडे,भारती तायडे, रीता ताई पुसतकर,सपना भेंडकर,सरोज चिखलकर , शुभांगी पुसतकर,वर्षा ताई कुरहेकर,निलीमा आंजीकर, स्वाती निहाटकर,,सारीका पुसतकर , निलीमा चिखलकर,नलीनी‌ चिखलकर, रोशनी चिखलीकर, वैशाली आरोकर,चंदा तायडे, कुंदा तायडे, यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

बुधवारा येथील जुने समाज भवनाची कायापालट करु  :  खोडके

    कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय खोडके आणि अमरावती शहराच्या आमदार सुलभाताई खोड़के यांनी श्री शैव गुरव हितकारिणी मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाची स्तुती केली. सांगितले की, गुरव समाजाचा नेहमी आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. बुधवारा येथील गुरव समाजाच्या जुन्या भवनाच्या जागी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार. यावेळी त्यांनी सर्व बटुकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटो देखील काढला. 

          कार्यक्रमात धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी आवर्जून भेट देऊन आयोजनाची प्रशंसा केली आणि गुरव समाजाच्या सहकार्यांचे उल्लेख करत आपल्या मतदारसंघात गुरव समाजाचे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणार असल्याचे आश्वासन दिले. माजी स्थायी सभापती तुषार भारतीय यांनी सांगितले की, गुरव समाजाचे सदर आयोजन कौतुकास्पद आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...