मुख्य सामग्रीवर वगळा



लाज, वाटली पाहिजे!
                                 
               लेखक - नारायण रा. खराद
                       संवाद : 8805871976


       'लाज' हा जसा स्त्रियांचा अलंकार, संस्कार आहे, तसा पुरुषांचाही. प्रत्येकाला 'लाज' ही वाटलीच पाहिजे. 'लाज' ही एक मर्यादा आहे. कोणतीही मर्यादा ओलांडताना लाज वाटली पाहिजे. कोणतेही लाजिरवाणे कृत्य आपल्या हातून घडू नये, ह्याची सदैव काळजी घेतली गेली पाहिजे.
       लाज सोडलेली अनेक माणसे अनेक ठिकाणी दिसतात. तेव्हा तोंडून शब्द बाहेर पडतात, 'लाज वाटली पाहिजे!' लाजने गरजेचे आहे. लाज हा संस्कार आहे, संवेदना आहे. एकदा लाज सोडली की बाकी आपोआप सुटते. आपली कुणाला लाज वाटेल, इतके लाजिरवाणे असू नये.

      लाज बाळगणारी माणसे कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करतात. स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी लाज सोडणारी माणसे कवडीमोल असतात. स्वाभिमान नसलेली ही माणसे कणा नसलेली असतात. अपमान म्हणजे काय हे त्यांना कळत नाही. अशा लोकांना कशाचीही लाज वाटत नाही.
     सर्व बेजबाबदार लोकांना लाज वाटली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आपले जे कृत्य इतरांना त्रास देते, ते कृत्य करताना लाज वाटली पाहिजे.


       स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा बळी देणे, त्यास दगा देताना लाज वाटली पाहिजे. कोणताही कामधंदा न करता खातांना लाज वाटली पाहिजे.
दिसेल त्या स्त्रीकडे वासनांध दृष्टीने बघण्याची लाज वाटली पाहिजे. आईबापाच्या पैशांची मुक्त उधळण करण्याची मुलांना लाज वाटली पाहिजे.



      दिवसभर राबणाऱ्या नवऱ्याला दोन वेळेचे जेवण वेळेवर न देणाऱ्या बायकोला लाज वाटली पाहिजे. सरकारी गडगंज पगार असताना, सामान्य, गरीब लोकांना लूटणाऱ्या सरकारी नोकरांना लाज वाटली पाहिजे.
      आज समाजाला लाज वाटणाऱ्या लोकांची खूप गरज आहे. 'लाज' स्वतःला लावलेली शिस्त आहे, तो एक सदाचार आहे. विद्यार्थी दशेत अभ्यास न करता, उनाडक्या करताना लाज वाटली पाहिजे. आई बापाला न जुमानता लफडी करणाऱ्या मुलींना लाज वाटायला पाहिजे. तोकडी वस्त्र वापरताना, स्वैराचारी तरुणींना लाज वाटली पाहिजे.
    सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, रस्त्यावर मुतणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. उघड्यावर चाळे करणाऱ्या आशिकांना, बायांना घुरणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे.
      विद्यार्थ्यांना नक्कल करताना, मुलांचा हुंडा घेताना, स्वतःचेच घर भरणा़ऱ्या नेत्यांना, लग्नाआधी किंवा नंतर पळून जाणाऱ्या पोरींना लाज वाटली पाहिजे.
       विवाहित असून स्वयंपाक न येणाऱ्या बायकोला, घरकामाचा कंटाळा असलेल्या बायकोला लाज वाटायला पाहिजे.
       समाजातील सर्वच घटकांना लाज वाटण्याची गरज आहे. आज सर्वत्र लाज सोडलेली माणसे दिसत आहेत. कोणतेही चुकीचे वर्तन हे लाजिरवाणे असते, त्याची जर लाज बाळगली तर ते घडणार नाही. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, त्या गोष्टीची ती वाटलीच पाहिजे. मग ती फुकटचे खाण्याची असो की चोरी करण्याची असो.
      जो जितका लाजतो, तो तितका सुसंस्कृत.
(योग्य वाटल्यास सामायिक करतांना लघुलेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)
               ooooo



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...