अनुष्काराजे एकनाथ खेडकर हिने प्राप्त केले शंभर टक्के गुण
अकोला : नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाद्वारे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेत अकोला येथील माउंट कारमेल स्कूलमधील कु अनुष्काराजे खेडकर हिने शंभर टक्के गुण प्राप्त करून शाळेमधून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
तिने गणित आणि संस्कृत विषयांमध्ये देखील शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत. कु अनुष्का ही कळंबा बुद्रुक येथील नागरिक डॉक्टर एडवोकेट एकनाथ खेडकर यांची कन्या असून तिच्या वडिलांनी देखील ग्रामीण भागातून पुढे येत अतिशय खडतर मेहनत करून एम ए एम फिल, नेट सेट, पीएचडी आणि एलएलबी इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा