मुख्य सामग्रीवर वगळा

जागतिक परिचारिका दिनानिमित्त 

कांचनमाला डहाके व अलका पापडकर यांना कस्तुरीचा' सदाफुली ' पुरस्कार



अकोला :  आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगल यांची जयंती व जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून 'कस्तुरी' या सामाजिक संस्थेने अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिसेविका श्रीमती कांचनमाला डहाके व प्राथमिक आरोग्य केंद्र , आगर येथून निवृत्त झालेल्या आरोग्य सेविका सौ.अलका शंकरराव पापडकर यांना  ', सदाफुली पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.  जगभरातील  परिचारिकांचं  अमूल्य योगदान  व सेवाकार्याच महत्त्व अधोरेखित करण्यासाठी , त्यांच्या कार्याचा गौरव आणि सेवावृत्ती विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभर जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येतो.  परिचारिकांचे परिश्रम आणि निस्वार्थ समर्पण आरोग्य सेवा प्रणालीचा भक्कम पाया आहे ,साथीच्या काळात त्यांच्या विलक्षण त्यागाची अनेक उदाहरणे मानव जातीला प्रेरणा देणारी आहेत. अशा या महान सेवाकार्याची आपण ही दखल घेतली पाहिजे  या उदात्त भावनेतून  कस्तुरी या सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक ' परिचारिका दिन' साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे ' सदाफुली ' ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे वर्षभर बहरत असते व तिच्या अंतर्भूत सद्गुणांचा समाजाला अविरत उपयोग होत असतो . त्याचप्रमाणे ' परिचारिका देखील ऊन , वारा, पाऊस याची पर्वा न करता वर्षभर रुग्णांची सेवा करत असते तिच्या या समर्पित सेवेची दखल घेऊन कस्तूरी ने श्रीमती कांचनमाला डहाके आणि सौ. अलका पापडकर यांना' सदाफुली ' पुरस्काराने सन्मानित  केले..शाल, श्रीफळ गुलाबपुष्प, स्मृतिचिन्ह व गंधकस्तुरी स्मरणिका असे पुरस्काराचे स्वरूप होते. यासमयी कस्तूरी या सेवाभावी संस्थेने  केलेल्या सेवाकार्याची दखल घेतल्याबद्दल कस्तुरीविषयी कांचन डहाके व सौ अलका पापडकर यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपण केलेला सन्मान हा सर्वोच्च असून तो श्रींचा प्रसाद आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.शांताराम बुटे, सौ. करुणा बुटे, वसंतराव खोटरे, प्रा. प्रभाकर पाटील, संजय गायकवाड,  संजय ठाकरे, अनिल पालवे, वसंतराव देशमुख, राम भिरड, चेतना आनंदानी , ज्योती लोकवानी ,सौ. संगीता जोध ,राजेश्वर पेठकर , दामोदर नुपे व सौ.अलका पापडकर व कांचनमाला डहाके या दोन्ही कुटुंबातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...