मुख्य सामग्रीवर वगळा

 

•  संत श्री गजानन महाराजांची पालखी ४ ला अकोल्यात

•  पालखीचे ५६ वे वर्ष


अकोला : 
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी निमित्त मोठी यात्रा भरते. देशभरातून अनेक भाविक तिथे दर्शनाला जातात. त्यात वारकऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. या आषाढी वारीसाठी येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी यंदा शेगावहून २ जून रोजी प्रस्थान करणार आहे.
        परंपरेनुसार यंदाही श्रीसंत गजानन महाराज संस्थानची श्रींची पालखी ज्येष्ठ शु. ७ म्हणजेच २ जून रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे. 



      श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी, वारकरी, पताकाधारी सहभागी होणार आहेत. पंढरीनाथांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या ५५ वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे.
        या दिंडीमध्ये एक वीणेकरी, टाळकरी व पताकाधारी स्वयंशिस्तीने चालत असतात. मजल दरमजल करीत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, तिथे भजन, कीर्तन, प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात. मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते.

श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास

२ जून रोजी श्रीक्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्हयातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. ३ जून रोजी पारस येथून गायगाव येथे, तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे ४ व ५ जून असे दोन दिवस मुक्काम राहील. ६ जून रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव, ७ जून रोजी देऊळगाव (बाभूळगाव) -पातूर, ८ जून मेडशी श्रीक्षेत्र डव्हा, ९ जून मालेगाव शिरपूर जैन, १० जून चिंचापा पेन म्हसला पेन, ११ जून किनखेडा रिसोड, १२ जून पानकन्हेरगाव- सेनगाव, १३ जून श्रीक्षेत्र नरसी (नामदेव) तेथून पुढे पालखीचा नेहमी प्रमाणे प्रवास राहणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...