मुख्य सामग्रीवर वगळा

 


"मन शांत नसेल, तर...

औषधंही काम करत नाही...



     औषध घेतल्यावरही फरक जाणवत नाहीये? रक्त तपासणं, स्कॅनिंग, टेस्ट… सगळं नॉर्मल येतंय, पण तरीही त्रास कमी होत नाहीये? कदाचित त्रास शरीरात नसून, मनात असतो. “मन जेव्हा अशांत असतं…” ताण, चिंता, भीती, राग, अपराधीपणा या सगळ्या मनाच्या विषारी भावना तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम करतात. या मानसिक असंतुलनामुळे पचन, झोप, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती अशा अनेक शारीरिक गोष्टी बिघडतात.  



      आणि मग औषधं दिली तरी  तयार नसलेल्या जमिनीवर पाणी घातल्यासारखं काम होतं. 

      औषध हे ‘support’ आहे – ‘मुख्य उपचार’ नाही!  कोणताही डॉक्टर – हृदयाचा असो, त्वचेचा असो, पचनाचा असो, किंवा होमिओपॅथिक – जर पेशंटचा mental state अस्थिर असेल, तर औषधं हळूहळू किंवा कमी काम करतात.



       मग उपाय काय?

मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.  सकाळी 10 मिनिटं ध्यान, प्रार्थना, किंवा नुसतं शांत बसणं.

      नेहमी स्वतःशी प्रेमाने बोला

“मी ठीक आहे. मी बरा होतोय. मी माझ्या शरीराचा आदर करतो.”  रोज थोडा वेळ निसर्गात घालवा.  फुलं बघा, मातीला हात लावा, गच्चीत बसा.  

      सकारात्मक लोकांशी बोला

नकारात्मक लोकांचं तात्पुरतं social detox करा!  तुमचा ताण बोलून व्यक्त करा.  डायरी लिहा, मित्राशी बोला, गरज लागली तर थेरपिस्टकडे जा.

       मनाचं आरोग्य

     शरीराच्या उपचारांचा पाया  मनावर उपचार झाल्यावर औषधं जास्त प्रभावी होतात, आहार पचतो, झोप येते,  रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीर बरे होण्याचा वेग दुप्पट होतो. ही पोस्ट उपयोगी वाटली, तर आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा.  कदाचित कोणाचं तरी मन शांत झालं, तर शरीर आपोआप बरे होईल.


(विशेष सूचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा.)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...