बालसंस्कार व योग प्राणायाम शिबिराचा समारोप
अकोला : स्थानिक डाबकी रोड वरील श्री राजराजेश्वर योगासन मंडळ श्री मेतकर संकुल डाबकी रोड अकोला द्वारा आयोजित बाल संस्कार शिबिराचा नुकताच समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. अकोला जिल्हा आरोग्य भारतीचे अध्यक्ष, शहरातील सुप्रसिद्ध धन्वंतरी आणि योगशिक्षक डॉ. गजानन कऱ्हे आणि ज्येष्ठ नागरिक तथा योगशिक्षक दयारामजी मेतकर यांच्या मार्गदर्शनात ' मेतकर संकुल' येथे १ ते ७ मे दरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ५ ते १५ वयोगटातील १०५ बालकांची उपस्थिती होती. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.बालकांचा नैतिक , मानसिक , बौद्धिक, अध्यात्मिक विकास व्हावा हे उद्दिष्ट समोर ठेवून योग प्राणायाम,संस्कृत श्लोक पठन ,सनातन संस्कृती , वारकरी संत साहित्य इ . विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.जुन्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने डाबकी रोड येथील नंदाने मंगल कार्यालय जवळील श्री मेतकर संकुल मध्ये मागील २३ वर्षापासून सातत्याने योगप्राणायाम दैनंदिन वर्ग रोज सकाळी ५.४५ ते ७.१५ या वेळेत आयोजन करण्यात येत असून मागील ३ वर्षांपासून दरवर्षी मे महिन्यात बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.डाबकी रोड जुने शहरातील नागरिकांसाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातत्याने श्री राजराजेश्वर योगासन मंडळाद्वारे योगप्राणायाम शिबिराचे आयोजन ही डाबकी रोड येथील रहिवाश्यांकरीता विशेष पर्वणी या माध्यमातून उपलब्ध आहे.यावर्षी च्या आयोजित बालसंस्कार शिबिरात बालकांनी व पालकांनी अतिशय उत्साहात सहभाग नोंदवला.शिबिरात बालकांना दररोज खाऊ / अल्पोपहार चे देखील वितरण करण्यात आले.
तसेच उत्तम योग प्राणायाम करणाऱ्या तीन मुलांना तीन मुलींना बक्षीस स्वरूपात पुस्तकांचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला. या शिबिरात डॉ. गजानन कऱ्हे यांचे सोबत दयारामजी मेतकर,ह. भ.प . गोपाल महाराज जोगदंड , रामदासजी राठोड , सौ. प्रतिभा ठणगण, डॉ .सौ. माधुरी सोनी व इतर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ. अशोक ओळंबे व श्री. गजानन घोंगे यांचे हस्ते निवडक शिबिरार्थीना बक्षीसवितरण करण्यात आले. बालसंस्कार शिबिराच्या यशस्वितेसाठी सुनील मावळे , डॉ. माधुरी सोनी , सौ. प्रतिभा ठणगण , दीपक झाडे , पुरुषोत्तम लांडे, संजय सालफडे, मुकूंद धनवर, सौ. शीला सूर्यवंशी , सौ . निमकर्डे ,दीपक मोडक , प्रवीण सोनी, प्रा. किशोर बुटोले व इतर सर्व मंडळातील सदस्यांनी व मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले.
ooooooooooooooooooooooooooooooooo
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा