मुख्य सामग्रीवर वगळा



•  शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसेंनी घेतला पुढाकार 

•   संत गाडगेबाबांचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा प्रयत्न

अमरावती दि.2 :  शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांचे श्री संत गाडगेबाबा यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन श्री संत गाडगेबाबा कीर्तनासाठी जी गाडी वापरत होते, तीच गाडी ट्रेलरवर ठेवून  संपूर्ण महाराष्ट्रात फिरवली.   आणि श्री संत गाडगेबाबा यांचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा जिकरीचा प्रयत्न केला. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाला ते अमरावतीला आले असताना मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांची भेट घेतली. 




     श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर संत गाडगेबाबा हे नाटक तयार झाले असून गाणी गाडगेबाबांची हा कार्यक्रम देखील तयार झालेला आहे. या कार्यक्रमाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात व्हावे यासाठी प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली असून श्री संत गाडगे महाराजांचा विचारांचा प्रसार  व प्रचार करण्याच्या दृष्टीने या नाटकाचे प्रयोग व गाणी गाडगेबाबाची हे दोन उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यास तत्वतः मान्यता दिली.


       श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरील नाटक श्री विराज जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत होत असून गाणी गाडगेबाबांची हा कार्यक्रम  सुप्रसिद्ध गायक व संगीतकार गझलरत्न प्रा. डॉ. राजेश उमाळे यांनी तयार केला असून या कार्यक्रमाचे सादरीकरण ते त्यांच्या सहकारी गायक व गायिका यांना घेऊन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक श्री नितीन भट हे करणार आहेत. यापूर्वी देखील मिशन  आय ए एस ने प्रा. एम टी देशमुख यांची भूमिका असलेले क्रांतीयोगी गाडगेबाबा या नाटकाचे प्रयोग ठीक ठिकाणी आयोजित केले होते.


      शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या जीवनावर श्री संत गाडगेबाबा यांचा जबरदस्त पगडा असून त्याचे विचार जनमांनसामध्ये पोहोचावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. श्री संत गाडगेबाबा यांचे चालक व प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना त्यांनी मुंबईला बोलवून त्यांच्या निवासस्थानी सत्कार घडवून आणला. त्यांची मा. मुख्यमंत्र्यांबरोबर भेट करून दिली. माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री गाडगेबाबा यांचे चालक श्री भाऊराव काळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री संत गाडगेबाबा हे जे  वाहन कीर्तनासाठी वापरत होते ते आता जीर्ण झाली असून फिरण्याच्या परिस्थितीत नाही. पण माननीय श्री दादाजी भुसे यांनी ते वाहन ट्रेलरवर चढवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवले व गाडगेबाबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या बाबतीत जो सकारात्मक निर्णय घेतला त्याबद्दल मिशनचे अध्यक्ष श्री डी.व्ही.  मोडक,  स्वागत अध्यक्ष श्री गजानन पुंडकर, संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे,  कार्याध्यक्ष श्री नरेंद्र बोरकर, सदस्य श्री रवींद्र दांडगे, श्री नंदकिशोर खडसे, श्री माधव रेखे, सदस्य प्राचार्य रामदास चवरे, प्रा.शरद पुसदकर, गौतम मोहोड व श्री राजेंद्र इंगोले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

      या लोकाभिमुख उपक्रमामध्ये साहित्यिक चळवळीमध्ये आवड असणाऱ्या मान्यवरांनी सहभागी व्हावे असे आवाहन मिशन आयएएसने केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...