मुख्य सामग्रीवर वगळा

ASEAN मध्ये गवसलेलं रत्न!

आणि आकाशाने भारताला दिलेलं कन्यारत्न!

           लेखक- संभाजी बबन गायके
                         न-हे, पुणे.
                          Mob.  9881297260
      
        The Association of South East Asian Nations अर्थात ASEAN संघटनेचे नाव भारतासाठी नवीन नाही. आशियातील दक्षिणपूर्व देशांनी एकत्रित येऊन ही संघटना स्थापन केली आहे. अर्थातच आपल्या भारत देशाचा या चळवळीत मोठा वाटा आहे. 
      थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी बहुदा १८ देश आसीयान मध्ये सामील आहेत. जगात इतर जागतिक महासत्ता असताना आणि त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या असताना, त्यांच्या तुलनेने लहान असणाऱ्या देशांच्या स्वतःच्या काही समस्या असतात, त्या सोडवण्यासाठी या लहान देशांनी एकत्रित येणे गरजेचे होते. 
       या सर्व अठरा देशांच्या पायदळ सैन्याचा एक मोठा प्रशिक्षण आणि संयुक्त सराव २०१६ मध्ये पुण्यात पार पडला. यांपैकी १७ देशांच्या सैन्याचे नेतृत्व पुरुष करीत होते... मात्र भारतीय सैन्यतुकडीचे नेतृत्व होते सोफिया कुरेशी या कणखर तरुणीकडे!
       होय, याच त्या मेजर सोफिया कुरेशी मॅडम. तुम्ही भारताने  पाकिस्तानी अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर चढवलेल्या हवाई हल्ल्याचे media briefing करताना पाहिलेल्या सैन्याधिकारी!
       भारतीय सैन्याच्या दळणवळण विभागात Signal Corpse मध्ये या एक अतिशय आदरणीय अधिकारी म्हणून गणल्या जातात. दळणवळण संदर्भातील कामांत त्या वाकबगार असून अतिरेकी विरोधी कारवायांत आघाडीवर असतात. Asean सारख्या मोठ्या सैन्य संमेलनात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे! 
       त्यावेळी मेजर जनरल पदावर असलेले व पुढे Chief Of Defence Staff या सर्वोच्च पदावर पोहोचलेले दिवंगत बिपीन रावत साहेब यांनी सोफिया यांच्याबद्दल बोलताना.. 'त्या अंगभूत नेतृत्वगुण आणि कौशल्याच्या जोरावरच या सन्मानास पात्र ठरल्या आहेत..' असे गौरवोद्गार काढले, हे लक्षणीय आणि सोफिया यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे आहे!
       गुजरात मध्ये वडोदरा येथे १९८१ या वर्षी जन्मलेल्या सोफिया या microbioligy विषयात पदवीधर आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक पदावर कार्यरत होते.. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय सैन्याचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले. त्यांनी १९९९ मध्ये OTA Chennai येथून भारतीय सेनेत प्रवेश मिळवला. २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये त्या पंजाब येथे कर्तव्यावर होत्या. त्यांचे यजमानही mechanized infantry मध्ये कार्यरत आहेत!
       सोफिया यांनी UN Peace Keeping Force मध्ये आणि पुढे Congo या युद्धग्रस्त देशात अनेक वर्षे सेवा बजावली असून त्यांना military negotiations आणि सेवाकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.


      Briefing मध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या व्योमिका नावाचा अर्थच मुळी आकाश कन्या असा आहे.. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच हवाई दलात कारकिर्द घडवण्याचा चंग मनाशी बांधला होता. आणि हा हट्ट खराही करून दाखवला. भारतीय हवाई दलात एक अत्यंत धैर्यवान, कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते! 'चिता' आणि 'चेतक' नावांची अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स त्या लीलया उडवतात... अडीच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी यशस्वी केली असून काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी अत्यंत खराब हवामानात एकही अपघात होऊ न देता संकटग्रस्त लोकांची सुटका करण्यात यश मिळवले होते.
       व्योमिका सिंग यांनी २१,६५० फूट उंचीवर असणाऱ्या माउंट मणिरंग शिखरावर यशस्वी चढाई सुद्धा करून दाखवली आहे! २००४ मध्ये हवाई दलात प्रवेश मिळवलेल्या व्योमिका मॅडम २०१७ मध्ये विंग कमांडर बनल्या!


       या दोघींनी आज जे केलं.. तो इतिहास आहे! यांना briefing ची जबाबदारी देऊन भारतीय सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.... सुवासिनी महिलांचे सौभाग्य कुंकू पुसणाऱ्या नेभळट देशाला या आरशात काही दिसेल, ही भाबडी अपेक्षा!
      India is proud of you both... Colonel Sofiya madam and Wing Commander Vyomika Singh
 madam.. Jai Hind! 🥷🥷🇮🇳🫡
 धन्यवाद. 
(माहितीपूर्ण वाटल्यास सामायिक करतांना लघुलेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...